पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ; अंबाजोगाईत 15 ते 17 एप्रिल दरम्यान धृपद संगीत महोत्सवाचे आयोजन
शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम
==============================================
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
अंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखावजवादक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दि. 15 ते 17 एप्रिल दरम्यान मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहामध्ये धृपद संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध देशातील मान्यवर आपले संगीत सादर करणार आहेत. या तीन दिवसीय महोत्सवाचा रशिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा पखावज सातासमुद्रापार पोहोंचविणारे अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांनी महाराष्ट्रातील सांप्रदयातील पखावाजाची ओळख संपुर्ण जगाला करून दिली. महाराष्ट्रातील पखावज त्यांनी सातासमुद्रापार नेला त्यांचाच वारसा पुढे त्यांचे चिरंजीव उद्धवबापू आपेगावकर हे पुढे नेत आहेत. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, शासन स्तरावर अडचणी आल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधुन व शंकरबापू आपेगावकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दि. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता आद्यकवी श्री.मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहा मध्ये धृपद संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी मंगल वाद्य 'पखावर वंदना’ पं.उद्धवबापू आपेगावकर व त्यांचे शिष्य सादर करणार आहेत. धृपद गायनासाठी भोपाळ येथील उस्ताद अफजलजी हुसेन तर नवी दिल्ली येथील धृपद गायन पद्मश्री उस्ताद वसिफुद्दीन डागर हे सादर करणार आहेत. रविवारी 16 एप्रिल रोजी पुणे येथील विदुषी मेघना सरदार, पं.उदयजी भवलकर यांचे धृपद गायन होईल. तर बिहार येथील पं.प्रेमकुमारजी मल्लीक व पं.प्रशांत मल्लीक यांचे धृपद गायन व जुगलबंदी रंगणार आहे. सोमवारी पं.भूषण कोष्टी (सुर बाहर वादन) तर कोलकत्ता येथील पं.सुप्रियो मैत्रो यांचे धृपद गायन होईल., उ.मोई.बहाउद्दीन डागर (मुंबई) यांचे रूद्रविना वादन होईल. त्यांना विवेक कुरंगळे हरिप्रसाद गाडेकर, सनतकुमार बडे, आसाराम जोशी, अनंत जाधव, बंकटकुमार बैरागी, प्रशांत घरत, गुडे सर हे साथसंगत करणार आहेत. धृपद संगीत महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारी मंत्री अतुलजी सावे, खा.रजनीताई पाटील, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, आ.सुरेशराव धस, आ.विक्रमजी काळे, आ.सतिष भाऊ चव्हाण, आ.नमिताताई मुंदडा, आ.प्रकाश दादा सोळंके, आ.धनंजय भाऊ मुंडे, आ.अॅड.लक्ष्मणराव पवार, आ.संदीपजी क्षीरसागर, आ.बाळासाहेबजी आजबे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या तीन दिवसीय धृपद संगीत महोत्सवाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.
==================================================
Comments
Post a Comment