अंबाजोगाईत होणार 14 दिवसांचा 'भीमजयंती' महोत्सव



 संघर्षभूमी परिवार, अंबाजोगाईच्या वतीने 'भीमजयंती' महोत्सवाचे आयोजन                              

==========================================

अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

संघर्षभूमी परिवार, अंबाजोगाईच्या वतीने प्रतिवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवात विविध कार्यक्रम होतात. या वर्षीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने हा 'भीमजयंती' महोत्सव होणार आहे. 


अंबाजोगाईतील संघर्षभूमीवर होणारा हा महोत्सव 14 दिवस चालणार आहे. 1 ते 14 एप्रिल 2023 या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. या 'भीमजयंती' महोत्सवात पाच व्याख्याने, एक कवी संमेलन, चार प्रबोधनपर गीतांचे कार्यक्रम, एक शाहिरी जलसा, एक ऑक्रेस्ट्रा, एक नाटक तसेच अभिनय व गायनाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे. हे सर्व कार्यक्रम सम्राट अशोक विचारमंचावर व जयभीम विचारमंचावर होणार आहेत. दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9.30 या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. अंबाजोगाई शहर आणि तालुक्यातील सुजाण बंधु - भगीनींनी व नागरिकांनी या 14 दिवसीय कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संघर्षभूमी परिवाराच्या वतीने ॲड.शाम तांगडे, गुलाबराव गायकवाड, ॲड.संदीप थोरात, संजय हातागळे, डॉ.गणेश सुर्यवंशी, डॉ.किर्तीराज लोणारे, खंडेराव जाधव गुरूजी, द्रुपदाआई सरवदे, अनंत सरवदे, विश्वनाथ सावंत, पंकज भटकर, डॉ.बबनराव मस्के, अर्जून वाघमारे व बबनराव ठोके आदींनी केले आहे. 

                                                             

▫️▫️▫️

==============================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड