कु.मनवा मंगेश मुळी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत अंबाजोगाई तालुक्यात प्रथम
कु.मनवा मुळीचे सर्वस्तरांतून अभिनंदन
=========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध परीक्षा, जळगाव यांच्या वतीने दि.५ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत कु.मनवा मंगेश मुळी ही अंबाजोगाई तालुक्यातून प्रथम आणि महाराष्ट्रातून तेरावी आलेली आहे.
कु.मनवा ही अंबाजोगाई शहरातील स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदीर या शाळेची विद्यार्थीनी असून तिने प्राप्त केलेल्या या स्पृहणीय यशाबद्दल कु.मनवासह तिचे मार्गदर्शक, शिक्षक व तिचे पालक यांचे शालेय समिती अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सचिव सौ.स्वरूपाताई कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ. दिपालीताई जाधव, शिक्षक बंधु, भगिनी तसेच शालेय कर्मचारी यांच्यासह लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कचे संपादक रणजित डांगे यांनी अभिनंदन केले आहे.
========================.
Comments
Post a Comment