बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्रींचे कवि संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
"काळीज पेरले मी गर्भात या धरेच्या, कसे कुणास ठाऊक उगवून कर्ज आले"
- कवयित्री शितलताई बोधले
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित निमंत्रित कवयित्रींचे संमेलन अतिशय प्रतिसादात्मक व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. राज्यभरातून आलेल्या कवयित्रींनी आपापल्या वेगवेगळ्या संवेदना वेगवेगळ्या जाणिवा व्यवस्थेवरही प्रश्न मांडण्याचा कवितेतून अतिशय ताकतीने प्रयत्न केला.
बदलत चाललेल्या "ग्लोबलायझेशन" मध्ये कविता टिपण्या मध्येही त्याचे परिणाम दिसून येत आहेत आणि नवी पिढी हे कशी टिपत आहे हेही पाहण्याचे औस्युक्य या संमेलना मध्ये रसिकांना मिळालं. या कवी संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा सौ.उषाताई किशन भोसले (लातूर) या होत्या. प्रारंभी त्यांनी सर्व कवयित्रींना शुभेच्छा देऊन संमेलनाची सुरूवात वात करण्यात आली. यामध्ये श्रीमती नीलिमा देशमुख (जीवनाचा वृत्तांत), रजनी गिरवलकर (मीच भेटलो नाही), मीनाक्षी देशमुख (आम्ही निघालो चंद्रावर), शैलजा कारंडे विजया भणगे (सावित्री), वैष्णवी सोमवंशी (नारे), विमल मुदाळे( स्वप्ना मधलं जगणं), श्रीदेवी हांडे (आई), सुकन्या पवार (बेटी जब माॅं बन जाती है), अर्चना स्वामी (पावसा), शिलादेवी गायकवाड (आई, डॉ.सुरेखा बनकर (दान) सुलक्षणा सोनवणे (शाप) डॉ.मीना घुमे (इच्छाएँ) आणि पुष्पा बगाडे इत्यादी कवयित्रींनी सहभाग नोंदवला श्रीमती शितलताई बोधले यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने कवी संमेलन रंगत गेले अतिशय सुंदर आवाजामध्ये सूत्रसंचालन व कवितांना ही त्यांनी त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला शैलजा कारंडे यांची बायका असंही खोटं बोलतात...! ही कविता दाद देऊन गेली. दिवाळ सणासाठी मुराळी आला नसला, किंवा दिवाळीला ये म्हणून साधा फोन ही
भावाकडून आला नसला तरीही
आई - बाबांच्या माघारी धुसर होणारं माहेरपण जाणवू देत नाहीत सासरच्यांना त्यांना खोटंच सांगतात
भाऊ ये ये म्हणतोय पण, मलाच सवड मिळत नाही म्हणून...कितीतरी बायका असंही खोटं बोलत असतात...! यामध्ये अनेक नवोदित कवयित्रींनी ही सहभाग नोंदवला होता यात असणारी वैष्णवी सोमवंशी यांनी आत्ताच घडलेल्या तालुक्यातील घटनेवर नारे देऊन देऊन घशाला कोरड पडली या कवितेने प्रकाश टाकत रसिकांना आत्ममग्न केले. तसेच श्रीदेवी हांडे या नवोदित कवयित्रीने चिमणी आणि त्यांची पिल्लं याचा विदारक खेड्यातील चित्र अतिशय भेदक पद्धतीने मांडले यामध्ये डॉ.मीना घुमे यांनी "इच्छाएँ" व शिवकन्या साळुंखे यांनी "बेटी जब माँ बन जाती है" कविता सादर केल्या, या कवी संमेलनास बहुभाषिक करून रचना सादर केल्या. मीना घुमे यांची कविता आयुष्याला आत्मभान देणारी होती. कवयत्रींच्या या संमेलनास प्रथमच अंबाजोगाई मध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला. या कवी संमेलनाच्या सूत्रसंचालिका श्रीमती शितलताई बोधले या तशा उत्तम लेखिका, उत्तम अभ्यासू व प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका तर आहेतच ,पण प्रथमच त्यांना वेगवेगळ्या कवयित्रींच्या विषयांवर दाद देताना पाहिले व सूत्रसंचालनाने हे कवी संमेलन अधिकाधिक बहारदार झाले. शेवटी अध्यक्षीय भाष्य करताना उषाताई भोसले यांनी 'कृष्ण धावणार नाही' या कवितेने सर्व संस्कृतीला, असलेल्या व्यवस्थेवर अतिशय परखडपणे "स्त्रीला, धारातीर्थी पडशील तेव्हा कोणी कृष्ण धावणार नाही..." या कवितेने संमेलनाचा समारोप करण्यात आला.
=======================
Comments
Post a Comment