"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संस्कृत व वैदिक गणिताचा समावेश करावा"
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा, संचलित श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाईच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संस्कृत व वैदिक गणिताचा समावेश करावा" या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना देण्यात आले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा, संचलित श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, अंबाजोगाईच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० च्या अंमलबजावणीत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या वर्गांना मातृभाषेतून शिक्षण तसेच संस्कृत भाषा ज्ञानभाषा म्हणून १ ली पासून ज्ञानदान करणे व गणित विषय आवडीचा व्हावा यासाठी अभ्यासक्रमात वैदिक गणित या विषयाच्या अंतर्भावासाठी अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील बिंदू क्र.४.१७ मध्ये उल्लेख केल्यानुसार मराठी ही संस्कारक्षम भाषा आहे यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे तसेच संस्कृत भाषा व वैदिक गणित यांचाही अंतर्भाव व्हावा यासाठी श्री.खोलेश्वर प्राथमिक विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष उन्मेशजी मातेकर, शाळेचे मुख्याध्यापक अप्पाराव यादव, विभागप्रमुख सौ.वर्षाताई मुंडे, विभागप्रमुख चौरे सर, सहशिक्षक खराडे, गायकवाड सर व पाटोळे मामा निवेदन देताना उपस्थित होते.
======================
Comments
Post a Comment