बहुभाषिक साहित्य संमेलनातून प्रवर्तनवादी विचारांचा जागर - संमेलनाध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील
अंबाजोगाईत राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
=====================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था धानोरा (बु) आयोजित राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन शनिवार, दिनांक 11 रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ह.भ.प प्रकाश महाराज बोधले, संमेलनाध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील, साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे माजी मंत्री पंडितराव दौंड, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब, वसंतराव मोरे, उद्धव बापू आपेगावकर आयोजक सौ.मनीषा विद्याधर पांडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय बहूभाषिक परिवर्तन संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रस्ताविक करताना स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब म्हणाले की, माझा साहित्याशी कसला ही संबंध नसताना आयोजकांनी मला साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष केले. मी स्वागताध्यक्ष झाल्यानंतर अनेकांनी टीका केली. परंतु, आयोजक त्यांच्या निर्णयावर ठामच राहिले. या बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आम्हाला परिवर्तन घडवायचे आहे. युवकांना उद्योगाच्या प्रवाहात आणायचे आहे तसेच सामान्य जनतेचे विविध प्रश्न आता साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून मांडायचे असून अंबाजोगाईकरांच्या जिव्हाळ्याचे असणारे अंबाजोगाई जिल्हा, बुट्टेनाथ साठवण तलाव सारखे प्रश्न पुन्हा एकदा बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या विचारमंचावरून समोर आले आहेत. यावेळी अनेक गोष्टींचा स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब यांनी उहापोह केला. राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाचे उदघाटक ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांनी जो उपेक्षित तळागाळातील लोकांना केंद्रबिंदू मानून कार्य करतो त्याला कुठली ही शक्ती समाज मनातून उतरवू शकत नाही त्यामुळे तोच समाजमनावर अधिराज्य गाजवतो. या साहित्य संमेलनाचे हेच वैशिष्ट्य दिसत आहे. शिक्षणाचा आणि साहित्याचा काहीही संबंध नसतो साहित्य निर्मिती ही विचारातून निर्माण होते असे प्रतिपादन ह.भ.प बोधले महाराज यांनी केले. अन्न, वस्त्र, निवारा या तर भौतिक व शारिरीक गरजा असतात जे विचारावर जगतात ते माणूस म्हणून जगतात. हे बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलन हे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठीच आहे असे मत अध्यक्षीय समारोप करताना संमेलनाध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवराना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यात शरद - प्रतिभा शेतकरी साहित्य गौरव पुरस्कार विश्वंभर विराट, काव्यगौरव पुरस्कार दिनकर जोशी, नाट्यगौरव पुरस्कार डॉ.सिद्धार्थ तायडे, डॉ.लक्ष्मणराव पन्हाळे आरोग्य सेवा पुरस्कार डॉ.दीपक फुटाणे, लघुउद्योजक गौरव पुरस्कार बप्पासाहेब डावकर, समाजसेवा गौरव पुरस्कार यमुनाबाई सोनवणे, सामाजिक कार्य गौरव पुरस्कार शकीला बानू शब्बीर शेख, प्रफुल्ल शशिकांत, सूक्ष्म उद्योगगौरव पुरस्कार सुरेखा बंग, उर्दू शिक्षणगौरव पुरस्कार मुजीब काजी, योगेश्वरी पायसेस विश्वंभर ठोंबरे, कोरोना योद्धा पुरस्कार अनंत वेडे यांना रोख रक्कम 51 हजारांचा धनादेश देण्यात आला. या साहित्य संमेलनाच्या वतीने दुर्बल घटक कार्यगौरव पुरस्कार तोरणसिंग तारासिंग टाक याना देवून सन्मानित करण्यात आले. या अनोख्या उपक्रमातून राज्यस्तरीय भाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा विधायक संदेश दिला आहे.
=======================
Comments
Post a Comment