हैद्राबाद मुक्तीसंग्राम, पू.स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण दस्ताऐवज देण्याबाबत श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने आवाहन
श्री योगेश्वरी शिक्षण संस्था, संस्थेतील कर्मचार्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट अथवा निकटवर्तीय ज्यांचा हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग होता अशांच्या स्मृती जतन करणार
=============================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
बीड जिल्हा आणि अंबाजोगाई परिसरांतील नागरिकांना श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने हैद्राबाद मुक्तीसंग्राम आणि पू.स्वामी रामानंद तीर्थ या संदर्भातील महत्वाचे दस्ताऐवज देण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याची माहिती योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांनी दिली.
ते म्हणाले की, श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने पू.स्वामी रामानंद तीर्थ आणि हैद्राबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळ संस्था कार्यालय परिसरांत उभारण्यात येत आहे. श्री योगेश्वरी शिक्षण संस्था, संस्थेतील कर्मचार्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट अथवा निकटवर्तीय ज्यांचा हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग होता अशांच्या स्मृती जतन करण्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांना त्या अंशतः तरी अनुभवता येतील असे स्मारक, स्मृती स्थळ निर्माण करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे स्वामी रामानंद तीर्थ व हैद्राबाद मुक्तीसंग्राम संदर्भातील स्वामीजींच्या आठवणी, लढ्यासंबंधी संदर्भ, साहित्य, दस्ताऐवज, ग्रंथ पुस्तके, छायाचित्रे आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक त्यांची माहिती, कार्य व छायाचित्रे आपणांकडे उपलब्ध असल्यास ते श्री योगेश्वरी शिक्षण संस्था कार्यालयात सादर करावेत. या सर्व बाबींचा समावेश स्मृती स्थळामध्ये करण्यात येणार आहे इतर माहितीसाठी डॉ.शैलेष वैद्य (भ्रमणध्वनी क्र - ७०२०२८२४४९) यांच्याशी संपर्क साधावा इतिहासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या स्मृती स्थळासाठीचे दस्तावेज देण्यासंदर्भात श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे व कार्यकारी मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
=======================
Comments
Post a Comment