अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनातला अर्थसंकल्प सादर केला, मराठवाडा वॉटरग्रीड योजना पुनर्जिवीत करून क्रीडा विद्यापीठ स्थापन केले




- भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांची पत्रकार परिषद

------------------------------------------

लातुर (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

लोकशाहीच्या दरबारात अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जनतेच्या मनातील सुचना पालन करताना समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करून कुणाला ही बोट ठेवण्यास जागा देणारा नाही याची काळजी घेतली. शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगार, व्यापार एवढेच नव्हे तर वारकर्‍यांचा ही सन्मान अर्थसंकल्पात करण्यात आला असून केंद्र सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सहा हजार रूपयांची वाढ हाच खरा बहुमान कष्टकर्‍यांचा म्हणावा लागेल. विरोधक बोलायचं म्हणून बोलत असले तरी इतिहासात सामान्य जनतेसाठी कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प कधीच सादर झाला नसल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले.



भाजपाच्या शहर कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना कुलकर्णी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा जनतेच्या जीवनात जलक्रांती घडविणारा वॉटरग्रीड प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र कालच्या अर्थसंकल्पात हर घर जल योजने अंतर्गत वॉटर ग्रीडचा समावेश करून 21,000 कोटी रूपयांची केलेली तरतुद म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जलक्रांती घडविणारा निर्णय होय. 11 मोठी धरणे नळ योजनेतून एकमेकांना जोडणे, दुष्काळी भागात पाणी टाकणे, वाडी, तांडे, वस्ती ग्रामीण भागातील पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणार एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांच्या सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही हा क्रांतीकारक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ 2014 च्या नंतर तत्कालीन काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजुर केले होते. 2019 ला महाविकास आघाडी सरकार आल्याबरोबर विशेषत: अजितदादा पवारांनी एका रात्रीतून हे विद्यापीठ पुण्याला हालवून अन्याय केला होता. मात्र शिंदे - फडणवीस सरकारने वाळुज येथे विद्यापीठाला मंजुरी देत 50 कोटी रूपयांची आर्थिक तरतुद केली हा निर्णय खर्‍या अर्थाने स्वागताचा असल्याचे ते म्हणाले. या अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणात केलेली आर्थिक तरतुद शिवाय समाजातील वंचित घटकासाठी ही नविन पाच महामंडळे तयार करताना महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत समाजासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत कासिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, अ‍ॅटो रिक्षा, टॅक्सी चालक मालक महामंडळ, वडार समाजासाठी पहिलवान कै.मारोती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ घोषणा करून प्रत्येकी 50 कोटींची आर्थिक तरतुद केली. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प कसा असावा आणि त्यात काय असावे यासाठी जनतेच्या सुचना मागवल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर लोकांच्या मनातला अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील सर्व महिलांना बसमध्ये प्रवासात 50 टक्केची सवलत, "माझी लाडकी लेक" अंतर्गत मुलींच्या भविष्यासाठी शिष्यवृत्तीद्वारे निधीची तरतुद एवढेच नव्हे तर उपवर मुलीला 75,000 रूपयांची केलेली तरतुद म्हणजे महिलांचा सन्मान होय. शेतकर्‍यांना मासिक पगार स्वातंत्र्यानंतर असं चित्र कधीच नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिवर्षी सहा हजार रूपये सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री सन्मान योजनेतून राज्य सरकार सहा हजार रूपये देणार एकुण बारा हजार रूपये शेतकर्‍यांना मदत मिळणार. पीक विमा केवळ एक रूपायात भरून मिळणार हा निर्णय खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्यासाठी महत्वाचा वाटतो. एकुणच काय या अर्थसंकल्पात समाजातील वंचित, उपेक्षित, शेवटच्या माणसाचा विचार करून अंत्योदय ज्याची कल्पना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली होती. खर्‍या अर्थाने कल्याणकारी तथा सामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात घेवुन जाणारा अर्थसंकल्प असल्याचे राम कुलकर्णी म्हणाले. या पत्रकार परिषदेला लातुर शहर महानगर अध्यक्ष गुरूनाथ मगे, सरचिटणीस प्रविण सावंत, शिरीष कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड