४०० ते ५०० कोटींच्या ठेवी गटात दीनदयाळ बँकेस "बँको ब्ल्यू रिबन" पुरस्कार
दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
दीनदयाळ बँकेने सहकार क्षेत्रात संस्कार जोपासला ; "विश्वास, विकास आणि विनम्रता" हे ब्रीद घेऊन आश्वासक प्रगती साधली
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा विश्वास संपादन केला आहे. तत्पर व दर्जेदार बॅंकींग सेवा, सुविधा उपलब्ध करून देत दीनदयाळ बँकेने सहकार क्षेत्रात संस्कार जोपासला आहे. "विश्वास, विकास आणि विनम्रता" हे ब्रीद घेऊन आश्वासक प्रगती साधली आहे. बॅंकेच्या सर्वांगिण कार्याची दखल घेऊन ४०० ते ५०० कोटींच्या ठेवी जमविलेल्या गटात दीनदयाळ बँकेस "बँको ब्ल्यू रिबन" पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच या पुरस्काराने दीनदयाळ बँकेस गौरविण्यात आले आहे. बँकेच्या स्पृहणीय कामगिरीचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांच्याकडून स्वागत होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की यांनी सांगितले की, बँको नांवाचे एक प्रकाशन आहे. त्यांचेकडून संपादीत मासिकातून बँकिंग विषयावरील अद्ययावत माहिती नियमितपणे प्रसिद्ध केली जाते. "बँको" हे एक प्रतिष्ठित व विश्वासार्ह प्रकाशन असून, सहकार व बॅंकींग क्षेत्रात दरवर्षी उत्तम काम करणाऱ्या बँकांसाठी "ब्लू रिबन अवॉर्ड" या नावाने ते पारितोषिक देतात. दीनदयाळ बॅंकेच्या सर्वांगिण कार्याची दखल घेऊन दीनदयाळ बँकेस "बँको ब्ल्यू रिबन" पुरस्कार मिळाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी आपल्या बँकेस ४०० कोटी ते ५०० कोटी ठेवी असणाऱ्या बँकांच्या वर्गवारीत आपल्या बँकेने केलेल्या उल्लेखनीय कामाचा आढावा घेऊन, हे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. या पारितोषकाचे मूळ नांवच "ब्लू रिबन अवॉर्ड" असे आहे. यावर्षी हा पारितोषिक वितरण समारंभ महाबळेश्वर येथे संपन्न झाला. याप्रसंगी सहकार, बॅंकींग क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते या पारितोषकाचे वितरण करण्यात आले. दीनदयाळ बँकेच्या वतीने उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला. या वेळेस ज्योतींद्रभाई मेहता (राष्ट्रीय संरक्षक, सहकार भारती, नवी दिल्ली), अविनाश शिंत्रे (मुख्यसंपादक - बँको), अतुलजी खिरवाडकर (मुख्यकार्यकारी अधिकारी - कल्याण जनता सहकारी बँक, मुंबई (कल्याण), सहकार आयुक्त कवडे साहेब या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. "विश्वास, विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. या जाणिवेने अंबाजोगाईकरांना मागील २१ वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या उपक्रमांतर्गत आजपावेतो सदर व्याख्यानमालेत अनेक मोठे विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, इतिहास संशोधक, अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी रसिकांना वैचारिक मेजवानी देवून वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडलेले आहेत अशी माहिती दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.पत्की यांनी दिली. या निमित्ताने दीनदयाळ बँकेच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. या संदर्भात बोलताना दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष ऍड.राजेश्वर देशमुख म्हणाले की, बॅंकेच्या संचालिका व माजी मंत्री मा.सौ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पालवे) यांचे सातत्यपूर्ण अनमोल मार्गदर्शन, भारतीय रिझर्व्ह बँक आणि सहकार भारती यांनी वेळोवेळी केलेल्या विधायक सूचना, बँकेचे सन्माननिय अध्यक्ष अॅड.मकरंद पत्की, संचालक रा.गो.धाट, संचालिका सौ.शरयुताई हेबाळकर, संचालक सर्वश्री विजयकुमार कोपले, चैनसुख जाजु, राजाभाऊ दहिवाळ, इंजि.बिपीन क्षीरसागर, प्राचार्य किशन पवार, मकरंद कुलकर्णी, बाळासाहेब देशपांडे, डॉ.विवेक दंडे, प्रा.अशोक लोमटे, जयकरण सुरेशकांबळे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांच्या कुशल प्रशासकीय अनुभवातून, योग्य नियोजन, बॅंकेचे अधिकारी, शाखाधिकारी आणि कर्मचारीवृंद, पिग्मी एजंट यांच्या अथक परिश्रम व दूरदृष्टीतून आणि सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांचा विश्वास यामुळेच बॅंकेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. एक परिवार म्हणून काम करताना या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्न व योगदानातून दीनदयाळ बँकेची आज यशस्वीपणे घोडदौड सुरू आहे. अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष ऍड.देशमुख यांनी दिली.
======================
Comments
Post a Comment