केज मतदारसंघाच्या विकासासाठी अर्थसंकल्पातून मिळाला तब्बल १२७ कोटींचा भरीव निधी



आमदार नमिताताई मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला राज्य सरकारकडून भरभरून प्रतिसाद


४० रस्त्यांचे भाग्य उजळणार ; अंबाजोगाईतील मुख्य रस्त्यांसाठी ४२ कोटी, तर सा.बां.विभागाच्या इमारतींसाठी ४ कोटींचा निधी

========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने केज मतदारसंघावर निधीचा अक्षरशः वर्षाव केला आहे. आ.नमिताताई मुंदडा यांनी पाठपुरावा केलेल्या अनेक कामांची मागणी मान्य करत केज मतदारसंघातील विकासकामांसाठी तब्बल 127 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून अंबाजोगाई आणि केज तालुक्यातील 40 रस्त्यांसह विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.



केज मतदारसंघाचा सर्वांगीण विकास नजरेसमोर ठेऊन आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी मागील तीन वर्षांत वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मंत्रालयात विविध विभागांना भेटी देऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांची कर्तव्य तत्परता, सततचा पाठपुरावा याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडून मागील काही महिन्यात शेकडो कोटींचा निधी केज मतदारसंघातील विकास कामांसाठी देण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आ.मुंदडा यांनी इतर कामांचा पाठपुरावा सुरूच ठेवला. नुकतेच दोन दिवस दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यात आ. मुंदडा यांनी केलेल्या अनेक मागण्या मान्य करत केज विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी 126 कोटी 96 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील जवळपास 40 रस्त्यांची आणि विविध शासकीय इमारती उभे करण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये आडस ते सोनवळा, रस्ता सुधारणा करणे - 1 कोटी, दस्तगीरवाडी ते पोखरी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, कुंबेफळ ते राडी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, चनई ते माकेगाव रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी,अंबावळण ते पोखरी रस्ता सुधारणा करणे-1 कोटी 25 लाख, अंबावळण ते भारज पांदण रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 25 लाख, रामा- 64 ते कानडीबदन रस्ता सुधारणा करणे -1 कोटी 50 लाख, युसुफ वडगाव ते शिंदेवाडी रस्ता सुधारणा करणे- 50 लाख, शिरूघाट ते गदळेवाडी रस्ता सुधारणा करणे-2 कोटी, रा.म.- 64 ते वरपगाव रस्ता सुधारणा करणे-1 कोटी 75 लाख, जाधवजवळा ते आरणगाव रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 50 लाख, मांगवडगाव ते लाखा  रस्ता सुधारणा करणे- 2 कोटी 75 लाख, जोला ते पिंपळगव्हाण रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 50 लाख, युसुफवडगाव ते सावंत वस्ती रस्ता सुधारणा करणे- 50 लाख, खरमाटा ते पवारवाडी रस्ता सुधारणा करणे- 50 लाख, दहीफळ वडमाऊली ते लिंबाचीवाडी रस्ता सुधारणा करणे - 1 कोटी, एकुरका ते धोत्रा रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, धर्माळा ते प्रजीमा- 39 रस्ता सुधारणा करणे- 75 लाख, एकुरका ते मुंडेवाडी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, नारेवाडी ते मुंडेवाडी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, चंदनसावरगाव ते उंदरी रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 50 लाख, प्रजीमा-18 ते रानबाची वाडी रस्ता सुधारणा करणे - 1 कोटी 50 लाख, जिवाचीवाडी ते तुकुचीवाडी रस्ता सुधारणा करण- 75 लाख, नायगाव ते शिरपुरा रस्ता सुधारणा करणे-25 लाख, भालगाव ते प्रजीमा- 18 रस्ता सुधारणा करणे- 25 लाख, रा.म.- 209 ते जाधववस्ती (साळेगाव बसस्थानक) रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, कौडगाव ते सोमनाथ बोरगाव र रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी, धारूर- आसरडोह- मोरफळी- राक्षसवाडी-  ममदापूर- येल्डा रस्ता सुधारणा करणे- 7 कोटी, आपेगाव- देवळा- अकोला रस्ता सुधारणा करणे- 5 कोटी, येल्डा ते सोनहिवरा (धरोबा मंदिर), रस्ता सुधारणा करणे- 3 कोटी, नांदूरफाटा ते नांदूरघाट रस्ता सुधारणा करणे- 1 कोटी 70 लाख, ढाकणवाडी- रामेश्वरवाडी- खाडेवाडी रस्ता सुधारणा करणे- 2 कोटी 50 लाख, सांगवी- एकुरका- माळेवाडी- राजेगाव ते दैठणा रस्ता सुधारणा करणे - 3 कोटी 50 लाख, धनेगाव- नायगाव- सौंदना- इस्थळ- आपेगाव रस्ता सुधारणा करणे- 2 कोटी 50 लाख, केज- सोनीजवळा- आनंदगाव- पैठण- धनेगाव ते जिल्हा सरहद्द रस्ता सुधारणा करणे- 4 कोटी, कोरडेवाडी- विडा- मस्साजोग- बोरगाव- भोपला रस्त्यावर (काळेगाव घाट जवळ) पुलाचे बांधकाम करणे- 1 कोटी 50 लाख, खर्डा- चौसाळा- साळेगाव- माळेगाव रस्त्यावर (नाव्होली गावा जवळ) लहान पुलाचे बांधकाम करणे- 3 कोटी 50 लाख, प्ररामा- 16 बीड- इमामपूर- नेकनूर- आंबीलवडगाव- पोत्रा- चांदणी- पालसिंगन, रस्ता सुधारणा करणे- 10 कोटी, यशवंतराव चव्हाण चौक ते भगवानबाबा चौक रस्ता- 25 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वा.रा.ती. महाविद्यालय व रूग्णालय ते यशवंतराव चव्हाण चौक रस्ता- 17 कोटी, सा.बां.विभाग, अंबाजोगाई  कार्यालय इमारत बांधकाम- 3 कोटी 68 लाख, उप अधीक्षक  भूमीअभिलेख, केज. कार्यालय इमारत  दुरूस्ती- 34 लाख,  सा.बां.उपविभाग, केज. कार्यालय इमारत बांधकाम- 1 कोटी 67 लाख, सा.बां.उपविभाग, केज. येथे शाखा अभियंता निवासस्थान बांधकाम करणे- 1 कोटी 33 लाख, दिवाणी न्यायाधीश (क.स्त), केज यांच्या करिता निवासस्थानाचे बांधकाम करणे- 3 कोटी 71 लाख, एकूण- 126 कोटी 96 लाख या कामांचा समावेश आहे. वेळोवेळी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे आ.नमिताताई मुंदडा यांनी आभार मानले आहेत.


=========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड