कविता : "आली रे आली, धुळवंडी होळी"



अंबाजोगाई येथील कवी राजेंद्र रापतवार यांची कविता रसिकांसाठी देत आहोत...



"आली रे आली, धुळवंडी होळी"

*********************

आली - आली रे धुळवंडी होळी,

गुलाबी थंडी तुडवीत पायदळी.


शिव्या श्रापाच्या ज्वालांची उसळी,

परतवू स्नेह शितलतेच्या खोल तळी.


खाऊनी गोडधोड पुरणाची पोळी,

मिळेल का, स्नेह - आपुलकी सगळी.


पेटवूनी स्वार्थ तिरस्काराची होळी,

द्वेष मत्सराची होईल राख - रांगोळी.


दुर्गुण जाळण्याची संस्कार खेळी,

सद्गुणांची ती आणेल मांदियाळी.


नको वृक्ष तोडी पेटविण्या होळी,

देवूत आता दुर्गुणांचाच बळी.


बोंबा मारता कशाला शुभ काळी,

चैत्री वसंत ऋतु नव पल्लवी सगळी.


नकोच आता सोंग गोसावी बळी,

सुसंवादाने भरा माणसांची झोळी.


मोडून काढा प्रथा शिवराळ होळी,

सण उत्साहात फुलवू आनंद मेळी.


हिरण्यकश्यपू बहिणीने केली खेळी,

उद्देश भक्त प्रल्हाद जीवंत जाळी.


जळुन मेली होलीका जुन्या काळी,

राक्षसी वृत्तीची जळाली साखळी.


दुर्जन र्‍हास, सुखी सज्जन मंडळी,

सत्याचाच विजय सदा सर्वकाळी. 


राधा - कृष्ण प्रेमाची जणू भुपाळी,

रंगोत्सवाची ही मज्जाच वेगळी.


हिंदू नववर्ष या पूर्व संक्रमण काळी,

विश्वात आनंद देई रंगोत्सव होळी.


- © राजेंद्र रापतवार, 

अंबाजोगाई (जि.बीड.)

संपर्क क्रमांक :   9850986765


=========================

(विशेष टीप : सदर कविने त्यांच्या "आली रे आली, धुळवंडी होळी" या कवितेत व्यक्त केलेली मते ही त्यांची स्वतःची वैयक्तिक आहेत. या मताशी संपादक सहमत असतीलच असे नाही, याची कृपया नोंद घ्यावी. - संपादक, लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क.)


=========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड