जयंतीनिमित्त अंबाजोगाईत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीकडून प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन



वर्ष ३२ वे ; सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा प्रबोधनपर उपक्रम 

===========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)  

येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त यावर्षी ही प्रबोधनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.




अंबाजोगाईत मागील ३१ वर्षांपासून कार्यरत असलेली सर्वांत जुनी व सन २००२ साली शासनाकडे अधिकृतरित्या नोंदणीकृत झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक  जयंती उत्सव समितीची बैठक "अंबारी" शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथे समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.एस.के.जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि.१२ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या प्रारंभी समितीचे सचिव भगवानराव ढगे यांनी उपस्थितांसमोर मागील वर्षाचा जमाखर्चाचा अहवाल सादर केला. बैठकीत त्यावर चर्चा होवून सर्वानूमते त्या अहवालास मान्यता देण्यात आली. यावर्षी १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजित व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आणि सांगली येथील नामवंत व्याख्याते यांना आमंत्रित करून त्यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे. समितीच्या वतीने आयोजित बैठकीत उपक्रमाच्या यशस्वी आयोजनावर ही सविस्तर चर्चा होवून काही महत्त्वपूर्ण निर्णय ही घेण्यात आले. या बैठकीला समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.एस.के.जोगदंड, लंकेश वेडे (कार्याध्यक्ष), भगवानराव ढगे (सचिव), प्रा.गौतम गायकवाड (सहसचिव), अ‍ॅड.मीर महाजेर अली उस्मानी, शिवाजीराव खोगरे, संभाजीराव सातपुते, व्यंकटराव वेडे, सुखदेव भुंबे, एकनाथ टोनपे, प्रा.धोंडीराम झरीकर, ज्ञानोबा रोकडे, प्रा.पी.वाय.फुलवरे तसेच पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य यांची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन समितीचे सचिव भगवानराव ढगे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार समितीचे सदस्य सुखदेव भुंबे यांनी मानले.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड