11 व 12 मार्च रोजी अंबाजोगाईत राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाचा जागर
राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनास ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, खासदार इम्रान प्रतापगढी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार रजनीताई पाटील, आमदार दिलीपराव देशमुख, आमदार नमिताताई मुंदडा, उल्हासदादा पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थाच्या वतीने दिनांक 11 व 12 मार्च 2023 रोजी होत असलेल्या राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनास राज्यातील व देशातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन 11 मार्च रोजी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.मा.प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते होत असून, उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी, जम्मू काश्मिरचे काँग्रेस प्रभारी खासदार रजनीताई पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री पंडीतराव दौंड, केज विधान सभेच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा, काँग्रेसचे जेष्ठ नेते वसंतराव मोरे, अॅड.माधव जाधव, गोविंदराव देशमुख, संपादक चंदूलालजी बियाणी व स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळ्या नंतर परिसंवाद-1 होणार असून, गांधी ते गांधी या विषयावरील परिसंवादात माजी आ.उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होवुन या परिसंवादात गांधी फाऊंडेशन मुंबईचे समन्वयक संकेत मुनोत अल्पसंख्यांक सेल काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आ.मिर्झा वाजेत व सुप्रसिध्द लेखक संजय सोनवणी यांचा सहभाग राहणार असून, दुपारच्या दुस-या सत्रात शिक्षण व रोजगाराच्या संधी या विषयावरील परिसंवाद माजी आ.एम.एस.शेख यांच्या अध्यक्षतेखाली होत असून, या परिसंवादात वीज वितरण मुंबईचे संचालक मुरहरी केळे, कामगार आयुक्त मुंबई - लातूरचे मा.मंगेश झोले व वैद्यकीय अधिकारी धारूर डॉ.परवेझ एजाज शेख यांचा सहभाग राहणार आहे. संध्याकाळी आयोजित सुक्ष्म लघु उद्योजक व उद्योजकांचे मानसिक आरोग्य या विषयावरील परिसंवाद जिजामाता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था म.धानोरा व संमेलनाचे आयोजक मनिषा पांडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून, या परिसंवादामध्ये गुरूदास सेवाश्रम घाटनांदूरच्या यमुनाबाई सोनवणे, जालना येथील लघू उद्योजिका सौ.सिताबाई माहिते, वडवणीचे लघू उद्योजक बप्पासाहेब डावकर, अंबाजोगाईचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले व लातूरच्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाधिक्षक डॉ.महादेव बनसुडे हे सहभागी होणार असून, परिसंवादानंतर संध्याकाळी कवयित्री संमेलन होत असून, या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लातूरच्या कवयित्री सौ.उषा किसनराव भोसले राहणार असून, या कवि संमेलनात राज्यातील विविध ठिकाणाहून कवयित्री सहभागी झाल्या आहेत. या महिला कवि संमेलनाचे सुत्रसंचालन अंबाजोगाई येथील कवयित्री शितल बोधले - कदम करणार आहेत. संमेलनाचा दुसरा दिवस 12 मार्चची सुरूवात महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून संमेलनाचा प्रारंभ होईल. साताराच्या प्रा.कविता म्हेत्रे यांच्या "मी सावित्री जोतीराव फुले" हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला जाणार असून, त्यानंतर एकल महिला व समाजव्यवस्था या विषयावरील परिसंवाद उल्हासनगरचे मा.राज असरोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली होवून यात भूम - परांडाच्या वैशाली राहूल मोटे, म्हसवड - साताराच्या अॅड.कविता म्हेत्रे व अंबाजोगाईच्या अॅड.शोभाताई लोमटे यांचा सहभाग राहणार आहे. दुपारच्या सत्रा मध्ये कृषि संस्कृती शिक्षण सहकार या विषयावरील परिसंवाद अकोला मतदार संघाचे माजी आमदार हरिभाऊ भदे, यांच्या अध्यक्षतेखाली होवून या परिसंवादात मराठवाडा विभागाचे माजी आयुक्त उमाकांत दांगट, परभणी कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोकराव ढवण व माजी साखर संचालक किसनराव हरिदास यांचा सहभाग राहणार आहे. संमेलनाचा समारोप सोहळा संमेलनाध्यक्ष व महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असून, या समारोप सोहळ्यास माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी आ.संजय दौंड, पुण्याचे बबनराव जोगदंड, काँग्रेसचे जेष्ठ नेते अॅड.अनंतराव जगतकर, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख व लातूर जिल्हा बँकेचे संचालक संभाजीराव सुळ यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होणार असून, समारोप सोहळ्यानंतर संध्याकाळी खुले कवि संमेलन जेष्ठ कवि विश्वंभर वराट गुरूजी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यात अंबाजोगाई व परिसरातील मान्यवर कविचा सहभाग राहणार असून, या कवि संमेलानाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध कवि दिनकर जोशी व विडंबनकार बी.आर.मसने हे करणार आहेत. या दोन दिवसीय राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाची सांगता मुशायऱ्याच्या कार्यक्रमाने होत असून, या मुशायऱ्याच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ कुलकर्णी (पिंपळगांवकर) राहणार असून, या मुशायरा मध्ये देशातील प्रसिध्द शायर उपस्थित राहणार असून या मुशायराचे सुत्रसंचालन बेंगलूरचे प्रसिध्द शायर शफीक अदबी हे करणार आहेत. या संमेलनास राज्यातील व राज्या बाहेरचे विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून, या संमेलनात लघु उद्योजक, सूक्ष्म उद्योग, शेती, साहित्यिक, शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्काराचे आयोजन करण्यात आले असून, या बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनातील सर्व कार्यक्रमास रसिक बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील, स्वागताध्यक्ष असिफोद्दीन खतीब बाबा, आयोजक मनिषा पांडे, कार्यवाह विद्याधर पांडे, वसंतराव (आबा) मोरे व संमेलनाच्या सर्व कार्यकारणी सदस्यांच्या वतीने पत्रकार कक्ष येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात येत आहे. संमेलन तथागत गौतम बुध्द साहित्य नगरी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहे.
=====================
Comments
Post a Comment