चांदापूर येथे १९ फेब्रुवारी रोजी नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन
धम्म उपासक, उपासिका यांनी उपस्थित रहावे - पुज्य भिक्खु धम्मशील थेरो, एॅड.अनंतराव जगतकर यांचे आवाहन
१० फेब्रुवारी पासून "श्रामनेर " शिबिराची सुरूवात ; उपासकांनी सहभागी व्हावे
धम्म परिषदेचे “सम्यक संकल्प” या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
परळी तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन, वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १९ फेब्रुवारी २०२३ रोजी नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धम्म परिषदेला पुज्य डाॅ.भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा), यांच्या मार्गदर्शना खाली पुज्य भिक्खू प्रा.डाॅ.एम.सत्यपाल महाथेरो (मुळावा), पुज्य डाॅ.भदन्त इंन्दवंस महाथेरो (कुशीनगर), पुज्य भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली / बीड) आणि पुज्य भिक्खू रत्नदीप थेरो (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदेचे "सम्यक संकल्प" या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचा लाभ धम्म उपासकांनी घ्यावा असे आवाहन पुज्य भिक्खु धम्मशील थेरो, धम्म परिषदेचे अध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर यांनी केले आहे.
मागील काही वर्षांपासून बौद्ध धम्म उपासकांसाठी नांवारूपास आलेले सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर, ता.परळी येथे रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे नवव्या बौद्ध धम्म परिषदेची सुरूवात सकाळी ९ वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने होईल.
या धम्म परीषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनीचे अध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर हे असणार आहेत. तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रदीप रोडे (प्रियदर्शी धम्म संस्कार केंद्र, बीड), नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे, माजी नगरसेवक प्रा.डॉ.विनोद जगतकर, डी.एस.राठोड (संस्थापक, नाईक सेवा शिक्षण प्रसारक मंडळ), संग्राम लक्ष्मण गित्ते (सरपंच, चांदापूर), विलास गायकवाड (उपमुख्याध्यापक, योगेश्वरी नुतन विद्यालय, अंबाजोगाई), प्राचार्य डॉ.अरूण पवार (सखारामजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वसंतनगर), प्रा.विलास रोडे (मिलिंद काॅलेज, परळी वैजनाथ), सौ.शाहू विजय राठोड (सरपंच, वसंतनगर) यांची उपस्थिती लाभणार आहे, ज्या उपासकांना धम्म परीषदेला उपस्थित रहावयाचे आहे. त्या धम्म उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच धम्म परिषदेत सहभागी व्हावे तसेच परीषदेला येताना पुस - नंदागौळ - वसंतनगर तांडा या मार्गेच यावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. तसेच १० फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्रामनेर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा समारोप १९ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. ज्या उपासकांना श्रामनेर दिक्षा घ्यावयाची असेल त्यांनी आनंद वाघमारे (पट्टीवडगाव) मोबाईल क्रमांक - ८६६८२६७६५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै. जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, प्रा.गौतम गायकवाड, राहुल घोडके, जगन सरवदे, सचिन वाघमारे, विश्वनाथ भालेराव, व्यंकट वाघमारे, सिमा चंद्रकांत इंगळे आणि संयोजन समितीचे सुरेश मस्के (उजनी), गौतम कांबळे (बागझरी), राजाभाऊ चक्रे (साळुंकवाडी), जालींदर कसबे (साळुंकवाडी), सुरेश विजय कांबळे (पट्टीवडगाव), अशोक कांबळे (पट्टीवडगाव), वैजनाथ कांबळे (पट्टीवडगाव), प्रसिध्दीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर, सत्यपाल वाघमारे (पट्टीवडगाव), बौध्दाचार्य मुरलीधर कांबळे, माणिक रोडे, मिलिंद नरबागे, राज जगतकर, भारत जगताप, प्रा.बी.एस. बनसोडे, दत्ता सरवदे, सुगत सरवदे, हमीद चौधरी, किशोर इंगळे, प्रा.मधुकर शिनगारे, संजय साळवे (पुस), सुरेखा रोडे, अर्जून काळे, आकाश वेडे, विनोद रोडे, धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे, रूक्मिण गोरे, संजय सिंगनकर, सुहासिनी इंगळे, स्वप्निल रोडे, बंडू इंगळे, विजय हजारे, धम्मानंद मस्के, चांगुणाबाई हिरवे, पार्वती वेडे, उर्मिला वैद्य, कांताबाई बोराडे (भिमनगर), सुचिता सोनवणे, सुनंदा शिंदे, लता बडे, शिला जोगदंड (बोधीघाट), तुळसाबाई काळे, विद्या लक्ष्मण बाघमारे, पुष्पा गुणाजी होके, बाबा वाघमारे, एम.एम.गायकवाड, अमोल जगताप (नंदागौळ), लालनगर, क्रांतीनगर, कबीरनगर महिला मंडळ व रमाई आंबेडकर चौक महिला मंडळ, अंबाजोगाई आदींनी पुढाकार घेतला आहे.
======================
Comments
Post a Comment