मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी केला बीड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार - महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष अमोल चव्हाण यांची माहिती
(फोटो - मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे हे बीड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार करताना शेजारी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा नांदगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल चव्हाण हे दिसत आहेत.)
=======================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांनी नुकताच बीड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून त्या-त्या भागातील विकासाचे प्रलंबित प्रश्न समजावून घेतले, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरीता आपण कटिबद्ध आहोत याची जाणीव करून देत भविष्यातील दमदार वाटचालीसाठी मनसे कार्यकर्त्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा नांदगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल चव्हाण यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा नांदगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, माझी नांदगावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे साहेबांच्या हस्ते आणि सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे तसेच मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमंत धस आदींसह मनसे पक्ष पदाधिकाऱ्यांसह प्रमुख नेते उपस्थित होते. पुढे बोलताना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा नांदगावचे उपसरपंच अमोल चव्हाण यांनी सांगितले की, मी व माझे सहकारी हे मागील काही वर्षांपासून परळी व केज मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहोत. आजपर्यंत मी शेतकर्यांच्या बाबतीत संवेदनशीलता जोपासत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे, या कुटुंबाला सर्वोतोपरी सहकार्य करीत शेतकरी विमा लागू करून देण्यासाठी तसेच शासनस्तरावर विम्यासह विविध योजना, अनुदान, मदतीचा लाभ मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या अनुषंगाने त्यांना शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले आहे. जेष्ठ नागरिकांना वृध्दापकाळ मानधन योजना, निराधारांना मदत योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे. वेळोवेळी शासन व प्रशासनास निवेदने देऊन मागण्या मान्य करून घेतल्या आहेत, तसेच आपण सामाजिक दायित्व निभावताना नांदगाव आणि परीसरातील सर्वसामान्य लोकांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी शासकीय किंवा खाजगी दवाखाना असो नाही तर पोलिस स्टेशन, महावितरण कंपनीकडून डी.पी. मिळविणे, शेतकरी पिक विमा, सोयाबीन अनुदान, अळीच्या प्रादुर्भावाचे अनुदान, निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व त्याची भरपाई, मावेजा मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे वेळोवेळी दिलेल्या निवेदनातून मागण्या केलेल्या आहेत. गरजूंना विविध मूलभूत योजना पुरविण्यासाठी तसेच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आमच्याकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे. या समाजकार्याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नुकतीच माझी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना बीड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, निवडीनंतर मा.राजसाहेब यांनी राज्यासह बीड जिल्ह्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना मुंबई येथे बोलावून घेतले होते, त्यामुळे मी ही उपस्थित होतो, साहेबांनी बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध विकासाचे प्रलंबित प्रश्न यावर चर्चा केली. आम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा व आशिर्वाद दिले आहेत. असे अमोल चव्हाण यांनी सांगितले.
सामान्य जनताच परिवर्तन करेल हा विश्वास :
बीड जिल्हा परिषद निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना लढविणार आहे, समाजातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, सर्वसामान्य, वंचित व बहुजन घटकांना न्याय देणार आहोत, यासाठी मनसे हा पक्ष कटिबद्ध आहे, याच विचाराने आज आम्ही माननिय मनसे प्रमुख राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत, प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढविणार आहे असा निर्णय नुकताच कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला असून ही निवडणूक मनसेकडून मोठ्या ताकदीने लढविली जाईल. ग्रामीण भागात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. कायम राजकारणात आम्हीच पाहिजे असा काही लोकांचा मतप्रवाह बनला आहे. तो चुकीचा आहे, त्यामुळे बहुजन समाज आज राजकारणातून हद्दपार होत चालला असून सामान्य जनताच आता परिवर्तन करेल असा आम्हाला विश्वास आहे.
- अमोल चव्हाण (जिल्हाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना, बीड.)
=======================
Comments
Post a Comment