डॉ.राजेश इंगोले यांची इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागप्रमुखपदी निवड



डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन

----------------------------------------

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशन अंबाजोगाईचे सलग आठ वर्षे अध्यक्षपद भूषविलेले विक्रमादित्य डॉ.राजेश इंगोले यांच्या आय.एम.ए. संघटनेतील भरीव व दमदार कार्याची दखल घेत त्यांची थेट राज्यकार्यकरणीच्या सांस्कृतिक समितीचे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.इंगोले यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.


आय.एम.एचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे, डॉ.जयेश लेले, सचिव डॉ.संतोष कदम, माजी अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे, डॉ.दिनेश ठाकरे, डॉ.राजीव अग्रवाल यांच्यासह राज्यकार्यकरणीच्या सर्व सदस्यांनी एकमताने डॉ.राजेश इंगोले यांची सांस्कृतिक समितीच्या चेअरमनपदी निवड केली आहे. मागील आठ वर्षांपासून डॉ.राजेश इंगोले यांनी ज्या धडाडीने आणि तडफेने संघटनेचे काम केले त्याची दखल घेऊन राज्य कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी डॉ.राजेश इंगोले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड केली आहे. डॉ.राजेश इंगोले यांनी अंबाजोगाईच्या शाखेचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना संघटनेला तीन वेळा सर्वोत्कृष्ट शाखा, तीन वेळेस सर्वोत्कृष्ट अध्यक्ष असे विविध पुरस्कार मिळवून दिले. आय.एम.ए. संघटनेला विविध सामाजिक उपक्रम व कार्यात अग्रेसर ठेवत डॉ.इंगोले यांनी डॉक्टर्स संघटनेचा अध्यक्ष म्हणून कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करून संघटनेला समाजाभिमुख केले. कोरोना काळात शासकीय रूग्णालयात सर्व डॉक्टर्सची मोफत सेवा देण्याचा निर्णय तसेच कोरोना काळात रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी त्यांचे मनोबल वाढविणारा "ऑक्सिगान" हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रात गाजला होता. डॉक्टर्सच्या विविध प्रश्नांवर त्यांची आंदोलने गाजली आहेत. डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीबद्दल अंबाजोगाई स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, डॉ.विजय लाड, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.सचिन पोतदार, डॉ.अनिल भुतडा, डॉ.अतुल शिंदे, डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.विनोद जोशी, डॉ.योगेश मुळे, डॉ.उद्धव शिंदे, डॉ.विनोद जोशी, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.संतोष कुंडगिर, डॉ.कृष्णकुमार गित्ते, डॉ.श्रीनिवास बडे, डॉ.शिवराज पेस्टे, डॉ.राहुल डाके, डॉ. दत्तप्रकाश आव्हाड, डॉ.स्नेहल होळंबे, डॉ.मनिषा राठोड, डॉ.अरूणा केंद्रे, डॉ.वैशाली पोतदार, डॉ.प्रज्ञा किनगावकर, डॉ.दिलीप खेडगिकर, डॉ.एन.पी.देशपांडे, डॉ.उत्तम निसाले, डॉ.मधुसूदन बाहेती, डॉ.प्रताप टेकाळे यांनी आनंद व्यक्त करीत डॉ.राजेश इंगोले यांना भावी कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. तर माजी आमदार संजय दौंड, आमदार पृथ्विराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा, माजी नगरसेवक एम.ए.हकीम, महादेव आदमाने, वाजेद खतीब, डॉ.प्रा.योगेश सुरवसे यांनीही डॉ.राजेश इंगोले यांच्या निवडीचे स्वागत करून मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. डॉ.राजेश इंगोले हे उत्कृष्ट गायक असून त्यांनी यापूर्वी विविध गायन स्पर्धेत अनेक पारितोषिके पटकावली आहेत यासोबतच ते उत्तम क्रिकेटपटू असून आय.एम.ए.संघटनेच्या महाराष्ट्र संघात उपकर्णधार म्हणून ही खेळले आहेत. डॉ.इंगोले यांची संघटनेत राज्याच्या या महत्त्वाच्या पदावर निवड झाल्याबद्दल अंबाजोगाईतील सर्व मित्रपरिवार, हितचिंतकातून आनंद व्यक्त होत आहे.



=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड