डॉ.सुधीर देशमुख यांची सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती



डॉ.सुधीर देशमुख यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन

======================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांची सोलापूर येथील डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.



महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी काढण्यात आलेल्या शासकीय आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर येथील अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांची पुणे येथील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या रीक्त जागेवर डॉ.सुधीर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या आदेशावर सचिव शिवाजी पाटणकर यांची स्वाक्षरी आहे. सदरील आदेशाप्रमाणे डॉ.सुधीर देशमुख हे सोमवारी सोलापूर येथील डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार सांभाळणार करणार आहेत. सदरील नियुक्ती बद्दल डॉ.सुधीर देशमुख यांचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, मेडिसीन विभागप्रमुख डॉ.सिध्देश्वर बिराजदार, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, डॉ.सुरेश अरसुडे, डॉ.राहुल हाके पाटील, परमेश्वर भिसे, लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कचे संपादक रणजित डांगे आदींसह इतरांनी अभिनंदन केले आहे.


=========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड