यश संदेश अतिशीघ्रतेने पोचविणा-या मॅरेथॅान दौडीचा मी ही एक साक्षीदार..! - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस.बी.सय्यद











यश संदेश अतिशीघ्रतेने पोचविणा-या मॅरेथॅान दौडीचा मी ही एक साक्षीदार..!  

- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस.बी.सय्यद 

========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

इसवी सना पूर्वी ग्रीस जवळच्या मॅरेथॅान येथले युध्द जिंकल्याची सुखद वार्ता मायदेशी अथेन्स पर्यंत एका शिघ्रगती संदेश वाहकाने विना थांबा लांब दौड मारून त्यावेळी पोचविली होती. त्यांच्या या अतुलनीय कर्तबगारीच्या स्मरणार्थ अशी लंबी दौड करण्याची मॅरेथॅान स्पर्धेची परंपरा आजही तिथे व जगभर कायम आहे.  

अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष कै.बालासाहेब (तात्या) लोमटे यांच्या पाचव्या पुण्यस्मृतीप्रित्यर्थ नुकतीच अंबाजोगाईत अशीच एक भव्य दौड विभिन्न वयोगटांसाठी हर्षोल्हासात संपन्न झाली. महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून ऊत्स्फूर्तपणे प्रचंड संख्येने स्पर्धक तरूण मुले - मुली यात सहभागी झाली होती. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या अविस्मरणीय स्पर्धांच्या उद्घाटनपर सोहळ्यात अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम, उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांचे सोबत मला ही विशेष अतिथी म्हणून त्यात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. प्रेरणा नि आरोग्यदायी ठरलेल्या या स्पर्धेची निवडक क्षणचित्रे आपल्या माहितीस्तव देत आहोत..! 


- एस.बी.सय्यद  (अध्यक्ष, ग्रामीण विकास मंडळ, बनसारोळा/अंबाजोगाई.)


Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड