भाजपचे आमदार लक्ष्मणराव जगताप यांचे निधन

तीन टर्म लक्ष्मणराव जगताप आमदार राहीले

======================



पुणे (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मणराव जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

आमदार लक्ष्मणराव जगताप यांचेवर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आ.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. 


========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड