साधना अर्बन मल्टीपर्पज निधी लि. अंबाजोगाईचा प्रथम वर्धापन दिन साजरा


साधना अर्बन मल्टीपर्पज निधीच्या माध्यमातून नवउद्योजकांना अर्थपुरवठा 

- अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे

======================


सभासद ठेवीदारांचा विश्‍वास सार्थ ठरविणार - चेअरमन नागेश मस्के

======================



अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

येथील साधना अर्बन मल्टीपर्पज निधी लि. अंबाजोगाईचा प्रथम वर्धापन दिन रविवार, दि.1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शासन - प्रशासन, समाजसेवा, अर्थकारण या क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी सांगितले की, साधना अर्बन मल्टीपर्पज निधीच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक व्याजदर दिला जातो. सोने तारण, वाहन, मालमत्ता तारण आणि गृह कर्ज देवून साधना अर्बनने नवउद्योजकांना केलेला अर्थपुरवठा कौतुकास्पद आहे. या संस्थेने बँकींग क्षेत्रात एक सक्षम वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणून नांवारूपास यावे अशी अपेक्षा डॉ.खैरे यांनी व्यक्त केली. 



या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी विश्‍वास सिरसाट, गटविकास अधिकारी अकुंशराव चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक सोनेराव बोडखे, योगेश्‍वरी शिक्षण संस्था कर्मचारी पगारदार संस्थेचे अध्यक्ष मेजर एस.पी.कुलकर्णी उपाध्यक्ष राजकुमार साळवी, सामाजिक कार्यकर्ते माणिकराव जोगदंड, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बचुटे, उद्योजक शंतनू हिरळकर, साधना अर्बनचे चेअरमन नागेश शाहुराव मस्के, व्हाईस चेअरमन डॉ.गुलाबराव सिरसट यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन नागेश मस्के यांनी साधना अर्बनचा वित्तीय लेखाजोखा मांडला त्यांनी सांगितले की, संस्थेचा ग्राहक, सभासद, ठेवीदार यांचा विश्‍वास आपण सार्थ ठरविणार आहोत. समाजातील गरजू नवउद्योजकांना आधार देण्याचे काम करण्यात येईल. लोकांचा विश्‍वास सर्वात महत्वाचा आहे. हा विश्‍वास सोन्याच्या दागिन्या सारखा मौल्यवान आहे. संस्थेच्या वतीने आत्तापर्यंत एक वर्षात पंधरा लाख रूपये कर्ज वाटप केले. दहा लाख रूपयांच्या ठेवी जमविल्या आहेत. संस्थेकडे 550 खातेदार असून ऑडीट वर्ग ‘अ’ प्राप्त  आहे. बँकींगच्या विविध सुविधा पुरविल्या, गरजवंतांना मदत ही केली. असे चेअरमन मस्के यांनी सांगितले. गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले की, एक वर्षांपुर्वी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर होताना आपण पाहत आहोत. बँकींगच्या सर्व अत्याधुनिक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोंचविणे काळाची गरज आहे. ग्राहकांचा विश्‍वास संपादन करावा. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी विश्‍वास सिरसाट यांनी आर्थिक क्षेत्रात काम करताना कठीण, खडतर काळात अधिक परिश्रम घ्यावेत सध्याचे दिवस स्पर्धेचे आहेत. ग्राहकांना सजग राहून सेवा द्यावी व बँकींग सेवा अधिक बळकट करावी असे सांगितले. मेजर प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी सांगितले की, जनतेच्या हिताचा विचार करून बँक चालवावी बँकेतर्फे कर्ज वितरण करावे. गरजू , होतकरू मुलांसाठी पुढाकार घ्यावा, शैक्षणिक व शेतकरी कर्ज देण्यासाठी आग्रक्रम ठेवावा अशी अपेक्षा मेजर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यावेळस पोलिस उपनिरिक्षक सोनेराव बोडखे व राजकुमार साळवी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या भावी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोप करताना अधिष्ठाता डॉ.खैरे यांनी मौलीक सुचना करून संस्थेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे चेअरमन मस्के यांच्या मातोश्री जलसाबाई मस्के यांचा उपस्थितीत मान्यवरांनी विशेष सन्मान केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय सिरसाट यांनी केले तर उपस्थितांचे आभार चेअरमन नागेश मस्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ झांबरे पाटील, व्हाईस चेअरमन डॉ.गुलाबराव सिरसट, मारूती लोंढे, संतोष मस्के, चंद्रकांत जोगदंड, उत्तमराव डोंगरे, सुमित शिंदे, आदेश लोंढे, धनंजय वैरागे यांनी पुढाकार घेतला या कार्यक्रमास साधना अर्बन मल्टीपर्पज निधीचे खातेदार, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड