मार्डच्या सर्व मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचा जाहीर पाठींबा



- राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ.राजेश इंगोले यांची माहिती

---------------------------------------

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

सध्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्ड संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांना राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल जाहीर व प्रत्यक्ष पाठींबा देत असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉक्टर्स सेलचे प्रदेश सरचिटणीस सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


मागील काही दिवसांपासून वसतिगृहाची तात्काळ दुरूस्ती करणे, वरिष्ठ निवासी डॉक्टर्सच्या पदानिर्मिती करणे, सहयोगी व सहायक प्राध्यापकांची पदे तात्काळ भरून वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, सर्व निवासी डॉक्टर्सना समान वेतन व महागाई भत्ता तात्काळ अदा करावा या मागण्यांसाठी मार्ड ही संघटना बेमुदत संपावर गेली आहे. राष्ट्रवादीचे डॉक्टर्स सेलचे मा.प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस डॉ.राजेश इंगोले, शहराध्यक्ष डॉ.अभ्युदय चौधरी यांनी यावेळी संपस्थळी भेट देऊन या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष निवासी डॉक्टर्सच्या वसतीगृहास भेट देऊन वसतिगृहाच्या दुरावस्थेची पाहणी केली. यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध मागण्यांवर चर्चा करीत त्यांच्या समस्यांचे स्वरूप जाणून घेतले. यावेळी वसतिगृहाची दुरावस्था,पाणी गळत असलेल्या खोल्या, सर्वत्र भिंतीवर बुरशी येऊन झालेली बकाल अवस्था पाहून डॉ.नरेंद्र काळे, डॉ.राजेश इंगोले यांनी अशा अवस्थेत विद्यार्थी राहूच कसे शकतात असा सवाल करीत डॉक्टरला धन्वंतरीचा वंशज मानणाऱ्या डॉक्टर्सची ही दयनीय अवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पदाधिकारी यांच्याशी बोलताना डॉ.काळे, डॉ इंगोले यांनी डीपीडिसी निधीतून या वसतिगृहाची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात यावे असा पाठपुरावा आपण करूयात हा शब्द मार्ड पदाधिकाऱ्यांना दिला तसेच संघटनेच्या दुसऱ्या मागण्याही अत्यंत रास्त असून राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल या मागण्यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी मार्डचे सचिव डॉ.अजित अरबाड, सचिव अनुश्री कैन, उपाध्यक्ष डॉ.शेरखाने, वसतिगृह सचिव डॉ.संतोष कासारे, डॉ.शामलाल कोकाटे, मेस सचिव डॉ.रूपाली वाघमारे, डॉ.सागर गव्हाणकर, डॉ.निधी मेहता, महिला प्रतिनिधी जवेरीया शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड