अंबाजोगाईत भिमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान
इंडियन आयडॉल फेम महाराष्ट्राचा सुपरस्टार गायक संतोष जोंधळे यांच्या भीमगीतांच्या प्रबोधनपर कार्यक्रमास उदंड प्रतिसाद
बोधिघाट परिवाराच्या वतीने आयोजन
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
येथील बोधिघाट परिवाराच्या वतीने शहरात भिमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान सोहळा तसेच इंडियन आयडल फेम महाराष्ट्राचा सुपरस्टार गायक संतोष जोंधळे यांचा भीम गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बोधिघाट परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन माऊली मांदळे, महादेव पौळे, संघपाल जगताप, बाबाजी मांदळे आणि अतुल ढगे यांनी केले होते. या प्रबोधनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवानराव ढगे तर
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नरेंद्र काळे, बबनराव लोमटे, बाळासाहेब सोनवणे, डॉ.राहुल धाकडे, पीएसआय विष्णू रोडे, तलाठी नाना लाड, सामाजिक कार्यकर्ते जीवनराव कराड, आयुब शेख, बालाजी शेरेकर, पञकार दादासाहेब कसबे, हमीद चौधरी, अजित सांगळे, राजपाल जावळे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पीएसआय मनीषा गिरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूणा केंद्रे, भूलतज्ज्ञ डॉ.राजश्री धाकडे, मुख्याध्यापिका उषा वाव्हळकर, शिक्षिका सुलोचना अडसुळे, ग्रामसेवक
अश्विनी खुने, माजी नगरसेविका सुचिताताई सोनवणे या कर्तृत्ववान महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रा.अनंत कांबळे यांनी केले. याप्रसंगी इंडियन आयडल फेम महाराष्ट्राचा सुपरस्टार गायक संतोष जोंधळे यांनी सादर केलेल्या," महात्मा फुल्यांनी जर का शिकवलेच नसते सावित्रीमाईला। आज सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला", कार्यक्रमाची सुरूवात
"प्रथम नमो गौतमा , चला हो प्रथम नमो गौतमा" या सुंदर वंदन गिताने झाली. या कार्यक्रमात "वो बात करो पैदा। तुम अपनी जुबानो में। दुनिया भी कहे कुछ है मेरे भिम दिवानो में, अगर भिम ना होते । तो हम आज कहाँ जाते । हिरे भी निकलते है मिठ्ठी की, खदानो में।", "माझ्या भिमाची पुण्याई आम्हा माणुसकी देई त्याने दिधला आम्हा बुद्ध नवा, कोटी-कोटी दिनाचा सहारा जना मी तथागताची वाणी ज्योतीबाची गाणी", "मी वादळवारा विषमतेला थारा तिथे गाढणारा मी वादळवारा", "लय बळ आलय माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेब सायबांमुळं तुझ्यान माझ्या घरात, "अरं गावामध्ये गाव आहे ते महू गांव तिथ जन्मले भिमराव" सखे बाई गं
भिमाई त्यांची रामजी त्यांचे पिता तिथे जन्मले भिमराव", "तुला ठाऊक हाय तू
बंगला बांधला नवा त्यात भिमाचा फोटोच नाय, बुध्दांची मुर्तीच नाय, तुझ्या बंगल्याला जाळयचय काय", "मागून हल्ला नेहमीच करता समोर यायला का घाबरता", "कायदा लिहिलाय बापानं आमच्या
किंगमेकर भिमराजाने,
"अब झुकेगा नही साला मैं तो डँशिंग जयभीम वाला" यासह एकापेक्षा एक भिमगितांनी बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. इंडियन आयडल मराठी, सुर नवा ध्यास, नवा फायनल फेम सुपरस्टार गायक संतोष जोंधळे यांच्या भिमगितांच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला हे विशेष. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो नागरिक, महिला व युवकांनी घेतला. साऊंड सिस्टीमचे सुंदर नियोजन बळीराज माने यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बोधिघाट परिवाराच्या वतीने आयोजक माऊली मांदळे, महादेव पौळे, संघपाल जगताप, बाबाजी मांदळे, अतुल ढगे यांच्यासह राजू मोरे, कविराज सोनवणे, बाबासाहेब सरवदे, अतुल जोगदंड, योगेश जाधव यांनी पुढाकार घेतला.
========================
Comments
Post a Comment