महाराष्ट्रात विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले
चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर
======================
मुंबई (विशेष प्रतिनिधी- लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
महाराष्ट्रात विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुक जाहीर केली आहे.
त्यानुसार येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम :
अधिसूचना जारी करण्याची तारीख – 31 जानेवारी 2023
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2023
दाखल अर्जांची छाणणी – 8 फेब्रुवारी 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
मतदानाची तारीख – 27 फेब्रुवारी 2023
मतमोजणीची तारीख – 2 मार्च 2023
अशी आहे.
=====================
Comments
Post a Comment