जयप्रभा माध्यमिक विद्यालयाच्या पियुष इंगोलेने विज्ञान प्रदर्शनात पटकावले तृतीय पारितोषिक



जयप्रभा माध्यमिक विद्यालयाच्या पियुष इंगोलेचे सर्वस्तरांतून कौतुक 

=======================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क )

तालुक्यातील जयप्रभा माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पियुष इंगोले याने विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या सौर ऊर्जेवर चालणारी मोटारगाडी या पर्यावरणपूरक विज्ञान उपकरणास

तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.


मा.गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने दि.5 व 6 जानेवारी या कालावधीत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जयप्रभा माध्यमिक विद्यालय (ता.अंबाजोगाई) या विद्यालयातील विद्यार्थी वि.पियुष उत्तरेश्वर इंगोले याने शाळेचे सहशिक्षक मल्हारी धाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या "सौर ऊर्जेवर चालणारी मोटारगाडी" या पर्यावरणपूरक विज्ञान उपकरणास परीक्षकांकडून अंबाजोगाई तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. याबद्दल सहशिक्षक मल्हारी घाडगे व विद्यार्थी पियुष इंगोले यांचे जयप्रभा माध्यमिक विद्यालय व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. जयप्रभा माध्यमिक विद्यालयाच्या विकासाचा आलेख सतत वाढताना दिसून येत आहे. या विद्यालयाचा ग्रामीण भागातून सतत इयत्ता दहावीचा निकाल हा इतर विद्यालयापेक्षा चांगला असतो. या विद्यालयातील शिक्षकांनी सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना जास्तीचे तास घेवून शिक्षण देवून यापूर्वी मेडीकल, इंजिनिअर अशा विविध शाखेच्या अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी हे पाञ ठरलेले आहेत. जयप्रभा माध्यमिक विद्यालयात शिस्त, बौद्धिक, वैचारिक कार्यक्रम आयोजित करणे मुलांना राष्ट्रीय स्तरांपर्यंत नेण्यासाठी सराव करून घेणे. विविध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करणे व विद्यार्थ्यांना यश मिळवून देणे. या सर्व शैक्षणिक बाबीमध्ये जयप्रभा माध्यमिक विद्यालय अग्रेसर ठरले आहे. याबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव काकडे, सचिव शिवाजीराव खोगरे व सर्व संचालक यांनी शाळेचे मुख्याध्यापक बन्सी पवार, विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे सहशिक्षक मल्हारी घाडगे, क्रिडाशिक्षक अजय बुरगे, इंग्रजी विषयाचे शिक्षक यादव, मराठी, हिंदी विषयाचे शिक्षक बदन मस्के आदींचे याप्रसंगी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड