अंबाजोगाईत जय जवान आजी माजी सैनिक संस्थेत योगाचार्य दत्ता सदाशिव लांब (माजी सैनिक) यांच्या मोफत योगा अभ्यास वर्गाचे आयोजन




अंबाजोगाईकर नागरिकांसाठी खुष खबर :

 =======================

ज्या भारतीय सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामुळेच आज भारत देशाचे स्वातंत्र्य टिकून व अबाधित राहीले आहे. त्याच सैनिकांनी आज सेवानिवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकीतून समाज हितासाठी तसेच देशातील नागरिक व तरूण पिढी निरोगी व सदृढ रहावी या विधायक उद्देशाने मराठवाड्यातील पहिले योगा अभ्यास वर्ग सुरू करून अंबाजोगाईतील नागरिकांचे जीवनमान व आयुष्य वाढविण्याचे मोलाचे कार्य हाती घेतलेले आहे. हे विशेष होय.


आता अंबाजोगाईत जय जवान आजी माजी सैनिक संस्थेत योगाचार्य दत्ता सदाशिव लांब (माजी सैनिक) यांच्या मोफत योगा अभ्यास वर्गाचे आयोजन 9 जानेवारी 2023 पासून करण्यात आले आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व तरूणांनी या मोफत योगा अभ्यास वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय जवान आजी माजी सैनिक संस्थेकडून करण्यात येत आहे. कारण, ज्या देशाचे नागरिक मजबूत व निरोगी असतात, तो देश जगात अधिक मजबूत असतो. त्या देशाचे भवितव्य हे त्या देशातील निरोगी नागरिकांवरच अवलंबून असते. 


▫️ योगा अभ्यास वर्गाची वैशिष्ट्ये :-


या योगा अभ्यास वर्गात

👇👇👇 


1) योगिक सूक्ष्म व्यायाम 


2) योगिक स्थूल व्यायाम 


3) सुर्य / चंद्र नमस्कार 


4) प्राणायाम 


5) आसन


6) योग मुद्रांए


7) एक्युप्रेशर 


8) ध्यान


9) अष्टांग योग


10) षटकर्म (शुध्दि क्रिया)


☝☝☝ हे शिकविण्यात येणार आहे.


▫️ ठिकाण : जय जवान आजी माजी सैनिक संस्था मंगल कार्यालय, योग प्रशिक्षण केंद्र, इंजिनिअरिंग काॅलेजच्या समोर, अंबाजोगाई (जि.बीड). 

 

▫️ वेळ : सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत (वातावरणानुसार वेळेत बदल करण्यात येईल.)


▫️ संपर्क : योगाचार्य दत्ता सदाशिव लांब (माजी सैनिक)

मोबाईल क्रमांक :

8264750304

9766583896 


▫️ केंद्रे साहेब 

+919970450135


▫️ सुरज गव्हाणे

+918975175205


▫️ कृपया पुढील लिंक ओपन करून पहावी :

 https://youtu.be/7ASz-n-N_UQ


(जनहितार्थ.)


=========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड