पुण्यात धक्कादायक प्रकार : ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह करणे महागात पडले

(सौजन्य : प्रतिकात्मक चिञ सोशल मिडीया)

========================

पुणे (विशेष प्रतिनिधी लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण करीत त्याची जीभ कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील फुरसुंगी भागात घडली आहे. याबाबत प्रिती  हरपळे (वय-38) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्याच्या फुरसुंगी जवळ असलेल्या एका नामांकित सोसायटी’त 28 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हस्के, शिवराम पाटील, किसन पवार यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. फिर्यादी प्रिती हरपळे या सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. सोसायटीत राहणाऱ्या सभासदांनी मिळून सोसायटीचा नावाने एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपचे ॲडमिन फिर्यादी यांचे पती किरण हरपळे हे होते. या ग्रुपमधील सभासद पोकळे हे वारंवार नको ते मेसेज टाकत असल्याने ग्रुप अ‍ॅडमीन हरपळे यांनी सुरेश पोकळे यांना एका ग्रुपमधून काढून टाकले. आरोपी पोकळे यांनी ग्रुपमधून रिमुव्ह का केले ? असा मेसेज पाठविला. मात्र त्याला हरपळे यांनी रिप्लाय दिला नाही. त्यामुळे आरोपीने हरपळे यांना फोन करून मला तुम्हाला भेटायचे आहे असे म्हणून हरपळे यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यावेळी पोकळे याने ग्रुपमधून मला का काढले..? अशी विचारणा केली. त्यावेळी हरपळे यांनी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज टाकत आहे. त्यामुळे आम्ही ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले. यामुळे चिडलेल्या पोकळे यांनी त्यांच्या मित्राच्या मदतीने किरण हरपळे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांची जीभ कापली गेली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एन.शेळके हे करीत आहेत.

=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड