किसान सभेच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल ; 10 दिवसांत कार्यवाही करण्याचे दिले लेखी आश्वासन
- किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एॅड.अजय बुरांडे यांची माहिती
=======================
बीड (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
खरीप २०२२ मधील अतिवृष्टी अनुदान, २०२२ मधील खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही. शेतकऱ्यांची बँक खाती होल्ड करणे. पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेतमालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार, दि ९ जानेवारी रोजी जिल्हा कचेरीवर बीड जिल्हा किसान सभेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत 10 दिवसात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे निदर्शने मागे घेण्यात आली.
बीड जिल्ह्यात शासन व पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची चेष्टा केली असून जानेवारी महिना सुरू असून अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळलेले नाही. शेतकऱ्यांच्या अनुदान, पीक विमा मिळत असलेल्या खात्याला शासन, विमा कंपनी व बँका होल्ड करीत आहेत. कृषी पंपाला योग्य दाबाने सलग 8 तास वीज पुरवठा देण्यात यावा. सोयाबीन व कापूस याचे दर कमी होण्यास कारणीभूत ठरलेले आयात धोरण,कापसू पिकावर कमी केलेले आयात शुल्क हे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचे ठरत असल्याने सर्व शेती मालास योग्य हमीभाव द्यावा यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभा, बीडच्या वतीने सोमवार, दि ९ जानेवारी रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आली. या आंदोलनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेत कृषी अधिकारी व पीक विमा कंपनी अधिकारी यांच्याशी चर्चा करून 10 दिवसांत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून अतिवृष्टी अनुदान व मदत देण्याचे आश्वासित केले. खरीप 2022 पीक विमा वाटप पारदर्शकता व तफावती दूर करण्याचा आदेश विमा कंपनीला दिला तर कृषी पंपाला 8 तास सलग व उच्च दाबाने वीज पुरवठा कसा करता येऊ शकेल याचे नियोजन करण्याचे महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना आदेशीत केले आहे. धारूर तालुक्यातील गांजपूर ते तांबवा या रस्ताचे डांबरीकरण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने उप कार्यकारी अभियंता (प्रधान मंत्री ग्राम सडक योजना) यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशीत केले. विमा प्रश्न, अतिवृष्टी अनुदान व इतर मागण्यांना घेऊन करण्यात बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या निदर्शनात जिल्हाभरातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजीने बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यावेळी दणाणून गेला. या निदर्शने आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एॅड.अजय बुरांडे, कॉ.काशीराम शिरसाठ, कॉ.दत्ता डाके, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ.जगदीश फरताडे यांनी केले.
========================
Comments
Post a Comment