कुंबेफळ उपकेंद्रासाठी अतिरिक्त ५ एमव्हीएचे रोहित्र मंजूर ; आ.नमिताताई मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश
● एक कोटी रूपयांचा येणार खर्च
=======================
केज (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) तालुक्यातील कुंबेफळच्या उपकेंद्रातील सध्याच्या रोहित्रावर प्रचंड ताण वाढल्याने विद्युत पुरवठ्यात विस्कळीतपणा येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आ.नमिताताई मुंदडा यांनी कुंबेफळ उपकेंद्रासाठी अतिरिक्त ५ एमव्हीएच्या रोहित्राची मागणी लावून धरली होती. अखेर मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कुंबेफळसाठी अंदाजे ९६ लाखांचे अतिरिक्त रोहित्र मंजूर करण्यात आल्याने जवळपास २० गावातील विद्युत पुरवठ्याचा प्रश्न मिटणार आहे.
कुंबेफळ उपकेंद्रावर जवळपास २० गावे अवलंबून आहेत. विजेची मागणी वाढल्याने या उपकेंद्रातील रोहित्रावर ताण पडून कमी व्होल्टेज मिळणे, ट्रीप होण्याचे प्रकार वाढले होते. विस्कळीत विद्युत पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना होत असणारा त्रास लक्षात घेत कुंबेफळ उपकेंद्रासाठी अतिरिक्त ५ एमव्हीएचे रोहित्र द्यावे अशी मागणी आ.नमिताताई मुंदडा यांनी सातत्याने लावून धरली होती. प्रशासकीय पातळीवर आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आ.नमिताताई मुंदडा यांनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कुंबेफळसाठी अंदाजे ९६ लाखांचे अतिरिक्त रोहित्र मंजूर करण्यात आले असून त्यासाठी निविदा देखील काढण्यात आली आहे. लवकरच हे रोहित्र बसण्याची चिन्हे असून त्यामुळे जवळपास २० गावातील शेतकऱ्यांना सुरळीत व उच्च दाबाने विद्युत पुरवठा करणे शक्य होणार आहे. दरम्यान, मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांची अडचण दूर केल्याबद्दल आ.नमिताताई मुंदडा यांनी पालकमंत्री अतुलजी सावे यांचे आभार मानले आहेत.
================
Comments
Post a Comment