मुस्लिम धर्मियांच्या बीड येथे होणाऱ्या इज्तेमा कार्यक्रमासाठी जादा बसेस सोडा - भाजपा अल्पसंख्यांक आघाडी शहराध्यक्ष अहमद करीम पप्पुवाले यांचे निवेदन

मुस्लिम धर्मियांच्या बीड येथे होणाऱ्या इज्तेमा कार्यक्रमासाठी जादा बसेस सोडा - भाजपा अल्पसंख्यांक आघाडी शहराध्यक्ष अहमद करीम पप्पुवाले यांचे निवेदन

========================


अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

मुस्लिम धर्मियांच्या बीड येथे होणाऱ्या इज्तेमा कार्यक्रमास जाण्यासाठी व परत येण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष अहमद करीम पप्पुवाले यांनी राज्य परिवहन महामंडळाचे अंबाजोगाई आगारप्रमुख यांना बुधवार, दिनांक 7 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.


भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष अहमद करीम पप्पुवाले यांनी राज्य परिवहन महामंडळाचे अंबाजोगाई आगारप्रमुख यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गुरूवार, दिनांक 08 व शुक्रवार, दिनांक 09 डिसेंबर 2022 या दोन दिवशी बीड येथे होणाऱ्या इज्तेमाच्या कार्यक्रमासाठी जादा बसेस सोडण्यात याव्यात. कारण, बीड येथे मुस्लिम समाजाचा धार्मिक कार्यक्रम "इज्तेमा" आयोजित करण्यात आला आहे, सदरील "इज्तेमा" कार्यक्रमासाठी बीड जिल्हा तसेच अंबाजोगाई तालुक्यातून मुस्लिम समाज बांधव हे हजारोंच्या संख्येने जातात. त्यामुळे त्यांच्या जाण्या व येण्याची सोय व्हावी या करीता आपल्या अंबाजोगाई आगाराच्या "अंबाजोगाई ते बीड" आणि "बीड ते अंबाजोगाई" येथे जाण्या व येण्यासाठी जादा बसेस सोडणे आवश्यक आहे. सदरील कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दिनांक 08 व 09 डिसेंबर 2022 रोजी जाणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांची संख्या जास्त असणार असून दिनांक 09 डिसेंबर 2022 रोजी सदर कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर परत येणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांची संख्या ही जास्त असणार आहे. ज्यात ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे, तसेच सध्या थंडीचे दिवस आहेत. म्हणून माणुसकीच्या दृष्टीकोनातून आगारप्रमुख साहेबांनी सदरील बाबींचा सहानुभूतीपुर्वक विचार करून उपरोक्त दिवशी "अंबाजोगाई ते बीड" जाण्या व येण्यासाठी जादा बसेस सोडाव्यात अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची एक प्रत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांना माहितीस्तव देण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे अंबाजोगाई आगारप्रमुख यांना देताना सामाजिक कार्यकर्ते व पञकार वाजेद शेख यांची ही उपस्थिती होती.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड