अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा शानदार पुरस्कार वितरण सोहळा

"जेष्ठांंना पुरस्कार हा अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा संस्कार" - अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे

======================          अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)


शिक्षक दिनानिमित्त सप्टेंबर महिन्यात अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे शिक्षक अवाॅर्ड जाहीर करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या आणि सध्या सामाजिक बांधिलकीतून रूग्णसेवेत कार्यरत असलेल्या तसेच अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ज्येष्ठ सदस्यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून "द ऑनररी एॅम्पा टिचर्स अवाॅर्ड" जाहीर करण्यात आले होते. यावर्षी हा सन्मान वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉ.पांडुरंग पवार, डॉ.नंदकिशोर देशपांडे, डॉ.दिलीप खेडगीकर आणि डॉ.एस.जे.सावळकर यांना जाहीर झाला होता. नुकताच एका दिमाखदार कार्यक्रमात व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा  पुरस्कार वितरण सोहळा अंबाजोगाईत संपन्न झाला.



अंबाजोगाईच्या इतिहासात अशा प्रकारचा पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून स्वा.रा.ती.वै.महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे व अधिक्षक डॉ.राकेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.श्रीनिवास रेड्डी हे होते. तर यावेळी विचारमंचावर एॅम्पाचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे "द ऑनररी एॅम्पा टिचर्स अवाॅर्ड" या पुरस्काराचे स्वरूप होते. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त डॉ.पी.एस.पवार, डॉ.दिलिप खेडगीकर, डॉ.शिवाजी सावळकर व डॉ.एन.पी.देशपांडे यांनी सत्काराला उत्तर दिले. डॉ.सुधिर धर्मपात्रे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. तर डॉ.नवनाथ घुगे यांनी एॅम्पा सदस्यांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक एॅम्पाचे अध्यक्ष डॉ.राहुल धाकडे यांनी केले. तसेच सुत्रसंचालन डॉ.मनिषा पवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.विठ्ठल केंद्रे यांनी मानले. यावेळी एम.पी.एस.सी.मधून निवड झाल्याबद्दल डॉ.सचिन चौधरी, डॉ.अनिल मस्के व डॉ.राजश्री धाकडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या निवडीसाठी डॉ.मनोज वैष्णव, डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.महेश ढेले व डॉ.योगिनी नागरगोजे यांची एक निवड समिती तयार करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कार्यकारीणीचे पदाधिकारी डॉ.विठ्ठल केंद्रे, डॉ.शितल सोनवणे, डॉ.शिवाजी मस्के, डॉ.ऋषिकेश घुले, डॉ.इम्रान अली, डॉ.मनिषा पवार, डॉ.सुलभा पाटील, डॉ.विशाल भुसारे यांच्यासह सर्व सन्माननिय सदस्यांनी पुढाकार घेतला होता.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड