शिवप्रेमींच्या वतीने बीड येथे राज्यपाल कोश्यारी हटाव जिल्हा कचेरी समोर तीव्र धरणे आंदोलन
========================
बीड (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हटाव यासाठी जिल्हा कचेरीसमोर शिवप्रेमी यांच्याकडून तीव्र स्वरूपात निदर्शन आंदोलन करण्यात आले.
यामध्ये अशोक हिंगे, डॉ.गणेश ढवळे, रमेश चव्हाण, अविनश नाईकवाडे, सुनिल सुरवसे, कुंदाताई काळे, अभिमान खरसाडे, प्रा.शिवाजी खांडे, गणेश मस्के, अशोक येडे, कमलताई निंबाळकर, युवराज मस्के, रामनाथ खोड, बापूसाहेब शिंदे, ज्ञानदेव काशिद, गणेश धोंडरे, संतोष डोंगरे, दयानंद गायकवाड, प्रा.विद्याताई जाधव, प्रा.छायाताई सोडंगे, धनंजय शेंडगे, विठ्ठल समीर, श्रीकांत बागलाने, संतोष माने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नियमितपणे बेताल वक्त करून महापुरूषांचा अपमान करीत आहेत. यापुर्वीही त्यांनी फुले दाम्पत्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. अलीकडेच त्यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावून छत्रपती शिवरायांचा अवमान केला आहे. जिल्हाधिकारी,बीड यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना देखील शिवप्रेमींच्या भावना कळवाव्यात म्हणून निवेदनाद्वारे राज्यपाल कोश्यारी हटावची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील शिवचरित्रावर चिखलफेक केली आहे. त्या अनुषंगाने त्यांची भाजपच्या प्रवक्ते पदावरून त्यांना हटवुन छत्रपती शिवरायांची व महाराष्ट्रातील शिवप्रेमींची माफी मागावी तसेच "हर हर महादेव" व "वेडात मराठे वीर दौडले सात" या शिवचरित्राची मोडतोड करणाऱ्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने तात्काळ घेण्यात यावा. सदरील निवेदनात या सर्व मागण्या करण्यात आल्या आहेत. वरील सर्व प्रकार निंदनीय आहेत, राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते या नात्याने ठोस उपाय अथवा प्रतिबंधात्मक पवित्रा घेण्यास विसर पडल्याने जाणून येत आहे, याचा अर्थ अशा अपप्रवृत्तीला आपला मूक पाठिंबा आहे हे सुचित होते आहे. त्या अनुषंगाने आपण नैतिक जबाबदारी व शिवरायांप्रति स्वाभिमान जपण्यासाठी आदर भावनेची जबाबदारी स्वीकारून आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता जोपसावी अशी मागणी बीड येथील शिवप्रेमी यांनी केली आहे. यावेळी सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने धरणे निदर्शने आंदोलनात सहभागी होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
Comments
Post a Comment