विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मदतीसाठी आवाहन

10 आणि 11 डिसेंबर रोजी पुणे येथील साने गुरूजी स्मारक, सिंहगड रोड येथे चौदावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे आयोजन

========================

पुणे (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

आजच्या तरूणाईच्या वैचारिक परिवर्तनास विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचा खूप मोठा वाटा आहे. शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट करणाऱ्या सगळ्या श्रमिकांचा अभिमानास्पद सांस्कृतिक वारसा प्रवाहित करण्याचे काम विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने सुरू आहे.


पुढील महिन्यात शनिवार, दिनांक 10 डिसेंबर 2022 आणि रविवार, दिनांक 11 डिसेंबर 2022 असे दोन दिवस पुणे येथील साने गुरूजी स्मारक, सिंहगड रोड येथे चौदावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित केले आहे. संमेलनात राज्यभरातून सुमारे दोन हजार लोक उपस्थित राहतील असा आयोजकांचा अंदाज आहे. आजवर आपण अनेकदा विद्रोहीच्या उपक्रमांना मदत केलेली आहे. पुण्यातील संमेलन हा मोठा उत्सव आहे यामुळे आपल्याकडून यावेळीही मदतीची अपेक्षा आहे मदतीसोबतच आपण वेळ काढून या सांस्कृतीक उत्सवात सहभागी व्हावे असेही आवाहन आहे.


गूगल पे / फोन पे क्रमांक -

9096094459 (समीर देवकर)




चौदावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची सविस्तर कार्यक्रम पत्रिका सोबत देत आहोत, शक्य असल्यास आर्थिक मदत नक्की पाठवा आणि मदत केली, नाही केली तरी देखील आपला अमूल्य वेळ काढून संमेलनास नक्की भेट दया. उपस्थित रहा, सहभागी व्हा...


शिवराम ठवरे - 9175273528

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड