आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी थेट संवाद साधा
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली
========================
मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
आगामी 2023 या वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (PM Narendraji Modi) हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ असे या कार्यक्रमाचे नांव असून, या कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
यासाठी अधिकृत वेबसाइट mygov.in द्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अर्ज करता येणार आहेत. ही प्रक्रिया 30 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. या संदर्भात शिक्षण मंत्रालयाने नुकतेच ट्विट करीत माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी वर्षात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (PM Narendraji Modi) यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. (pariksha pe charcha) परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत परीक्षेवर गप्पा मारण्यात येणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षांची भीती वाटू नये म्हणून त्यांना मौलिक असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे मुलांचे मनोबल वाढणार आहे. मुलांना परीक्षांची तयारी करण्यास मदत होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 9 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी नोंदणी करू शकतात. परीक्षा पे चर्चाच्या नोंदणीसाठी प्रथम innovateindia.mygov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करता येणार आहे. येथे मुख्यपृष्ठावर, ‘PPC 2022’ साठी लिंकवर क्लिक करून, पार्टिसिपेट नाऊवर क्लिक करायचे आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यापैकी कोणत्याही एका लॉगिनवर क्लिक करून सभासद होता येणार आहे. 2018 पासून "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षी 1 एप्रिल रोजी हा कार्यक्रम झाला होता. यावेळी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. यात 12 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग होता. दिवसेंदिवस या कार्यक्रमाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
=======================
Comments
Post a Comment