लातूर येथील कृषि महाविद्यालयात जागतिक मृदा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
सेंद्रीय कर्बवाढीतून मातीचे आरोग्य शाश्वत राहील - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले
========================
लातूर (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
येथील कृषि महाविद्यालय व एडीएम अग्रो उद्योग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयात सोमवार, दि.५ डिसेंबर रोजी ‘जागतिक मृदा दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले म्हणाले की, कृषि शास्त्रज्ञ मातीचे पृथ्थकरण करुन संशोधन करतात तर शेतकरी माती अंत:करणपूर्वक जतन करतात. पृथ्थकरण व अंत:करण यांचा सुवर्णमध्य साधून शेतीचे निव्वळ उत्पन्न वृध्दींगत होऊ शकते. मातीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. त्यातुनच मानवाचे व मातीचे आरोग्य दीर्घकाळ टिकेल. ते पुढे बोलताना असे ही म्हणाले की, सेंद्रीय कर्ब वाढीतून मातीचे आरोग्य शाश्वत राहील व त्याद्वारे जैवविविधता जपली जाईल. त्याबरोबरच शेतक-यांनी एकात्मिक पीक पध्दती अवलंब करुन मातीचे संवर्धन करावे. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी संचालक शिक्षण तथा ख्यातनाम मृदाशास्त्रज्ञ डॉ.विलास पाटील तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, डॉ.हेमंत पाटील, डॉ.जगदीश जहागीरदार, डॉ.अरुण गुट्टे, डॉ.नितीन गुप्ता, डॉ.अमोल ढवण व डॉ.पद्माकर वाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.पाटील त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले की शेती पशुधनाशिवाय अपूर्ण आहे. सेंद्रीय कर्ब जमिनीतील सुक्ष्मजीवसंख्या वाढवते. शेतक-यांनी शेतातील काडीकचरा, तण, वनस्पतींचे अवशेष जमिनीत गाडणे आवश्यक आहे. जमिनीतील मुलद्रव्यांच्या फक्त कमतरताच नव्हे तर त्यांच्यातील आंतरक्रिया समजून घेणे अन्नद्रव्यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. डॉ.अरूण गुट्टे यांनी लातूर जिल्ह्यातील जमिनीच्या समस्या व त्यावरील उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, सूत्रसंचालन कु.वैष्णवी काकडे व दत्तात्रय मुजमुले या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रकल्प समन्वयक डॉ.विजय भामरे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती व कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व विद्यार्थीनी कु.ऋतुजा जोशी हिने सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.विश्वनाथ कांबळे, डॉ.भागवत इंदुलकर, डॉ.दिनेशसिंह चौहान, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ.विठोबा मुळेकर, डॉ.विलास टाकनखार, डॉ.व्यंकट जगताप, डॉ.अनंत शिंदे, डॉ.संतोष कांबळे, डॉ.ज्योती देशमुख, डॉ.राजेश शेळके, डॉ.नितीन तांबोळी, डॉ.अनिस कांबळे, डॉ.सुनिता मगर, डॉ.विनोद शिंदे, डॉ.दयानंद मोरे, डॉ.ज्ञानेश्वर सुरडकर व डॉ.शिवशंकर पोले यांनी परिश्रम घेतले.
=========================
Comments
Post a Comment