अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या अंबाजोगाई तालुकाप्रमुखपदी पद्माकर सेलमोकर यांची नियुक्ती
पद्माकर सेलमोकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत
=======================
अंबाजोगाई (विशेष प्रतिनिधी)
अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या अंबाजोगाई तालुकाप्रमुखपदी पद्माकर दत्तात्रय सेलमोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबाजोगाईत पेशवा संघटनेला पुन्हा एकदा एक ज्येष्ठ, जाणकार व अनुभवी नेतृत्व लाभल्याने सेलमोकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
सेलमोकर हे सध्या अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव आहेत. तसेच त्यांनी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे अध्यक्ष म्हणून ही उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग व नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या या उल्लेखनिय कामगिरीबद्दल ब्राह्मण सभा, अंबाजोगाई यांच्या वतीने सेलमोकर यांना नुकतेच "सामाजिक सेवागौरव पुरस्कार" देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या समर्पित भावनेतून व बांधिलकीतून करीत असलेल्या समाजकार्याची नोंद घेवून अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या अंबाजोगाई तालुकाप्रमुखपदी पद्माकर दत्तात्रय सेलमोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, हि निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांच्या आदेशाने व राष्ट्रीय सरचिटणीस पंकज कुलकर्णी, उपाध्यक्ष वैभव कुलकर्णी, वकील आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व बीड जिल्हाप्रमुख ऍड.प्रसाद देशमुख व बीड जिल्हा सरचिटणीस संजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशी माहिती पेशवा संघटना, कार्यालय छञपती संभाजीनगर येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. तसेच अंबाजोगाईत नुकतीच ब्राह्मण शिखर संघर्ष समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभा, अंबाजोगाईचे अध्यक्ष अनिरूद्ध चौसाळकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विजय पिंगळे, शामराव कुलकर्णी, पेशवा महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.कल्याणीताई विर्धे, सौ.कल्याणी कुलकर्णी, अखिल भारतीय पेशवा संघटनेचे तालुकाप्रमुख पद्माकर सेलमोकर, संजयराव देशपांडे, सौ.करूणा अघोर, सौ.राजश्री पिंपळे, सौ.प्रतीक्षा जोशी, संजयराव लोणीकर, शिरीषराव पांडे, मकरंद सोनेसांगवीकर, महेश अकोलकर, राहुल कुलकर्णी, सुधाकर विडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत पद्माकर सेलमोकर यांचा ब्राह्मण शिखर संघर्ष समितीकडून सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, सत्काराला उत्तर देताना पद्माकर सेलमोकर म्हणाले की, आपण सर्वजण एकञ येवून कार्य करू, आपल्या सुचनांचे स्वागत आहे, अनुभवपणाला लावून सर्वांना सोबत घेवून, प्रभावी संघटन करून आणि आवश्यक तो निधी उभारून सामाजिक उपक्रम राबवूयात, पेशवा संघटना ही एक मानवतावादी दृष्टीकोन ठेवून कार्य करणारी सामाजिक संघटना आहे. यात ब्राह्मण समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत घटकांचा सहभाग आहे. राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य पेशवा संघटना व ब्राह्मण सभा करते, त्यामुळे पेशवा संघटना व ब्राह्मण सभेच्या माध्यमातून आपणांस एकञित येवून संवाद साधायचा आहे, विधायक चर्चेतून आपल्याला नक्कीच मार्ग सापडेल, या विश्वासाने आपण एकत्र येवूयात. भारतीय संस्कृती, आपले कुटूंब या सर्वांच्या स्वास्थासाठी आपण एकमेकांशी विचारांची देवाण - घेवाण करूयात असे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख पद्माकर सेलमोकर म्हणाले. या बैठकीस विजय पिंगळे तसेच सौ.कल्याणी विर्धे यांचे ही अनमोल मार्गदर्शन लाभले. बैठकीच्या यशस्वितेसाठी पेशवा संघटनेचे प्रसाद पाठक, शैलेश गोस्वामी, अविनाश अघोर, अजय पांडे, अवधूत देशपांडे, शैलेश कुलकर्णी, मंदार देशपांडे, रोहन जोशी, संकेत कुलकर्णी, अनंत औटी, अक्षय मोहरीर व सुमीत केजकर यांच्यासह ब्राह्मण सभेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुढाकार घेण्यात आला.
=======================
Comments
Post a Comment