भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अंबाजोगाईकरांची महावंदना व अभिवादन सभा
"बुद्धिष्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया" यांच्या पुढाकार
======================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त अंबाजोगाईकरांच्या वतीने महावंदना व अभिवादन सभेचे आयोजन "बुद्धिष्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया" यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बोधिघाट, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त अंबाजोगाईकरांच्या वतीने महावंदना व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी सर्व उपासक - उपासिका व आंबेडकरी जनतेने निळ्या निशाणाखाली एकत्रित यावे असे जाहीर आवाहन "बुद्धिष्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया" यांच्या वतीने करण्यात आले होते, त्याला आंबेडकरी चळवळीत कार्यरत प्रमुख नेते, कार्यकर्ते व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामुहिक बुध्दवंदनेसाठी सर्वांनी एकत्र यावे हा उदात्त व विधायक विचार मांडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परभणी नंतर लातूर आणि अंबाजोगाई येथे प्रथमच सामुहिक बुद्धवंदना घेऊन एक नवी परंपरा सुरू झाली, विशेष म्हणजे याप्रसंगी उपस्थितांपैकी कोणाचीही भाषणे झाली नाहीत. अतिशय गांभीर्याने आणि आगळे-वेगळे अभिवादन करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार पृथ्विराज साठे, माजी आ.संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबनभैय्या लोमटे, माजी नगरसेवक महादेव आदमाने, माजी नगरसेवक संतोष शिनगारे, माजी नगरसेवक सुरेश कराड, माजी नगरसेवक आसेफोद्दीन खतीब, मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहूल धाकडे, लंकेश वेडे, प्रा.डी.जी.धाकडे, प्रा.एस.के.जोगदंड, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे,एॅड.अनंतराव जगतकर, भगवानराव ढगे, राजेंद्र घोडके, एस.एस.जावळे, शैलेश कांबळे, प्रा.डॉ.एम.व्ही.कानेटकर, प्रा.किरण कांबळे, पञकार दादासाहेब कसबे, दिपक कांबळे, गणेश मसने, बालाजी शेरेकर, डी.के.कांबळे, सुनिल व्यवहारे, विद्याधर पांडे, उज्जैन बनसोडे, आकाश कराड, दत्ता सरवदे, बुध्दकरण जोगदंड, भिमसेन लोमटे, भारत वेडे, स.का.पाटेकर, प्रकाश बोरगावकर, गणेश मामा काळे, युवराज वाघचौरे, बाळासाहेब सोनवणे, राहूल सुरवसे, बळीराम उपाडे, बन्सी आण्णा जोगदंड, भारत सातपुते, संभाजीराव सातपुते, अतुल ढगे, माऊली मांदळे, दीपक कांबळे, बाबा मांदळे, महादेव पवळे, राजू मोरे, संघपाल जगताप, प्रियदर्शी मस्के, नेताजी यादव, डी.एन.आचार्य, शशिकांत सोनकांबळे, कुमार वेडे, रमेश गायसमुद्रे, नामदेव आचार्य, आश्रुबा कांबळे, भीमाशंकर शिंदे, दिलीप वाघचौरे, प्रा.डॉ.संतोष बोबडे, मंगलताई रोडे, सुचिताताई सोनवणे, सुनंदाताई घाडगे, शिल्पाताई गायकवाड, सुधाताई जोगदंड, प्रा.शकुंतलाताई धाकडे, विद्याताई कांबळे, ज्ञानोबा रोकडे, सुनंदाताई शिंदे, सविताताई ढगे, विमलताई सरवदे, भारत खांडके, विशाल जोगदंड, सूर्यकांत जोगदंड, बी.व्ही.सोनवणे, रवी आचार्य, बाबा गवळे, बापू सोनवणे व बोधिघाट महिला मंडळ आणि शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.राहुल धाकडे यांनी तर प्रास्ताविक एॅड.सुनिल सौंदरमल यांनी केले. यावेळेस दिलीप वाघचौरे यांनी बुद्धवंदना घेतली. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.डी.जी.धाकडे यांनी मानले. प्रारंभी प्रा.शकुंतलाताई धाकडे, सुनंदाताई घाडगे यांनी समायोचित गीते सादर केली. सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत अंबाजोगाई शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शहरातील सर्व उपासक - उपासिका व आंबेडकर प्रेमी जनता, सर्वपक्षीय मान्यवर, ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी महामानव डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रात्री बुद्धवंदना घेऊन महामानव डॉ.बाबासाहेबांचा पुतळा आणि बुद्ध मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्यात आल्या. या कामी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी चोख बंदोबस्त तैनात करून सहकार्य केले, तसेच शहरातील अनेक विभागातून बौध्द उपासक आणि उपासिका, सर्वपक्षीय दिग्गज मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, युवक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अतुल ढगे, बाबा मांदळे, माऊली मांदळे, महादेव पवळे, राजू मोरे, संघपाल जगताप आदींसह बोधिघाट येथील युवक, महिला मंडळाकडून पुढाकार घेण्यात आला. अभिवादन सभेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल बुद्धिष्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, अंबाजोगाईच्या वतीने सर्व उपासक - उपासिका व आंबेडकर प्रेमी जनता या सर्वांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
=======================
Comments
Post a Comment