अंबाजोगाईत 10 ते 12 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय खुल्या पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

श्री अंबाजोगाई क्रीडा,सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचा पुढाकार

----------------------------------

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)



लोकनेते माजी केंद्रिय कृषीमंञी खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत दि.10 ते 12 डिसेंबर 2022 रोजी भव्य राज्यस्तरीय खुल्या पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, या स्पर्धा आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे अशी माहिती निमंत्रक तथा बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण चंद्रसेन देशमुख यांनी दिली आहे.



भव्य राज्यस्तरीय खुल्या पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, बॅडमिंटन हाॅल येथे होत आहेत. या स्पर्धेचे उदघाटन शनिवार, दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटाला होणार आहे. उदघाटक म्हणून आ.धनंजय मुंडे माजी मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र राज्य) हे आहेत. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अमरसिंह पंडीत (अध्यक्ष, बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन), तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.संजय दौंड (माजी सदस्य, विधान परिषद), बजरंग सोनवणे (चेअरमन, येडेश्वरी सहकारी साखर कारखाना), शिरीष बोराळकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन), माजी आ.पृथ्वीराज साठे, एॅड.राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष,रा.काँ.पार्टी,बीड), माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे (डॉक्टर सेल,रा.काँ.पार्टी), दत्तात्रय पाटील (ज्येष्ठ नेते,रा.काँ.पार्टी), माजी उपनगराध्यक्ष बबनभैय्या लोमटे, राजपाल लोमटे, गोविंदराव देशमुख, विलासराव सोनवणे, ताराचंद शिंदे, मनोज लखेरा, शिवाजीराव सिरसाट, शंकरराव उबाळे, बालासाहेब शेप, डॉ.राजेश इंगोले, अमरराव देशमुख, सत्यजीत सिरसाट, बाळासाहेब सोनवणे हे मान्यवर उपस्थित राहतील. 

भरघोस बक्षिसांची लयलुट :

पारीतोषिकांचे स्वरूप सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे आहे. यातील पहिले बक्षीस पस्तीस हजार रूपयांचे, दुसरे बक्षीस पंचेविस हजार रूपयांचे, तिसरे बक्षीस पंधरा हजार रूपयांचे, चौथे बक्षीस दहा हजार रूपयांचे आणि क्वाॅर्टर फायनल मध्ये पोहोचलेल्या व पात्र असलेल्यांना प्रत्येकास बक्षीस पाच हजार रूपये एवढे आहे. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना नाथ प्रतिष्ठान (परळी वैजेनाथ) यांच्याकडून तब्बल एक लक्ष सहा हजार रूपयांची एकूण आठ पारीतोषिके देण्यात येतील, खुल्या पुरूष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेसाठी व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. सदरील स्पर्धेचे निमंत्रक श्री अंबाजोगाई क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे उपाध्यक्ष रणजित बालासाहेब लोमटे, बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण चंद्रसेन देशमुख हे आहेत. या स्पर्धेच्या आयोजना विषयी बोलताना स्पर्धेचे निमंञक प्रवीण देशमुख म्हणाले की, ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या परवानगीने तसेच माजी उपनगराध्यक्ष बबनभैय्या लोमटे यांच्या प्रेरणेने आणि शिवाजीराव सिरसाट व रणजित लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली आहे. अंबाजोगाई शहरात नेहमीच वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक, साहित्य, सामाजिक कार्यासाठी आमच्या मंडळाला अंबाजोगाईकरांचे मदत व सहकार्य लाभलेले आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम घेतले जातात, त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धा लोकनेते खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने होत आहेत. तरी सर्व खेळाडूंनी यात सहभाग घेऊन, याचा आनंद घ्यावा. हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे. अशा स्पर्धा सहसा शहरी भागातच होतात. त्याचा ग्रामीण भागातील खेळाडूला काहीही उपयोग होत नाही. ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेच्या रूपाने एक नवीन दालन उघडण्याचा आमचा विधायक प्रयत्न आहे. या आधी सुद्धा आमच्या क्रीडा मंडळाने तालुका, जिल्हा तसेच विभागीय एकेरी डबल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आपल्या आशिर्वादाने त्या स्पर्धेला सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. यापुढेही आम्ही अशाच स्पर्धा वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने आयोजित करणार आहोत. जेणेकरून या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूला एक सशक्त प्लॅटफॉर्म तयार होईल व हे खेळाडू राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी कामगिरी पार पाडतील. क्रीडा मंडळाने यापूर्वी सामाजिक बांधिलकीतून अनेक गरजू खेळाडूंना मदत केली आहे. यात फक्त वंचीत पण, गुणवान खेळाडूला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता आणि तो या पुढेही कायम राहील. या स्पर्धेत सहभागी खेळाडू आणि प्रेक्षक यांच्या संपूर्ण अल्पोपाहाराची 

व्यवस्था मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह, बॅडमिंटन सदस्य व मिञ परिवाराच्या सहकार्यातून करण्यात आली आहे. तरी सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. असे आवाहन निमंत्रक प्रवीण देशमुख (अध्यक्ष, श्री अंबाजोगाई क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळ) यांनी केले आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कैलास शेटे, डॉ.प्रविण दिग्रसकर, अनंत मसने, शरद लोमटे, महेश लोमटे, मुन्ना देशमुख, संजय अरसुडे, तुषार जोशी, किरण शेलमुकर, श्रीनिवास मोरे, संतोष कदम, सय्यद राजा, शाम तेलंग, चेतन पाडे, वसंत कांबळे, स्वराज भाजीभाकरे, श्रीपाद देशमाने, संकेत ढगे यांच्यासह सर्व बॅडमिंटनपटू आणि श्री अंबाजोगाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने पुढाकार घेतला आहे.


▪▪▪

========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड