सामाजिक कार्यकर्ते पवन सोमनाथ आप्पा गिरवलकर सेवागौरव पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते पवन सोमनाथ आप्पा गिरवलकर सेवागौरव पुरस्काराने सन्मानित

अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाचे संचालक पवन सोमनाथ आप्पा गिरवलकर यांचा गिरवली येथील एका कार्यक्रमात सेवागौरव पुरस्कार देऊन माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पवन गिरवलकर हे गेल्या सात वर्षांपासून जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाच्या माध्यमातून वृद्ध व निराधारांची सेवा करीत आहेत. समाजातील वंचीत व उपेक्षितांसाठी त्यांचे कार्य सुरूच आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे नेते प्रतापराव आपेट, सेवानिवृत्त कृषी अधिकारी कल्याण आपेट व परिवाराच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा व मान्यवरांची उपस्थिती होती. पवन गिरवलकर यांच्या झालेल्या सन्माना बद्दल भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, आनंद टाकळकर, सतीश दहातोंडे, प्रशांत सेलमूकर, अशोक कचरे, वरद मुडेगावकर यांनी स्वागत केले आहे.

=====================


Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड