खा.राहुलजी गांधी यांच्याकडे ॲड.माधव जाधव यांनी मांडली कैफियत

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) ची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल



- खा.राहुलजी गांधी यांच्याकडे ॲड.माधव जाधव यांनी मांडली कैफियत

=========================

अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भारत जोडो यात्रा खा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यांमध्ये असताना हिंगोली कडून वाशिमकडे जात असताना मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड.माधव जाधव यांना भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे सोबत चालण्याचा योग आला. यावेळी ॲड.माधव जाधव यांनी मराठवाडा व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) ची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असून भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) नुसार देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना विशेष अधिकार दिलेले असून त्या अंतर्गत मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ व विदर्भ विकास महामंडळ यांची स्थापना करण्यात आलेली होती. परंतु 1952 पासून आज तागायत या दोन्ही महामंडळांना कसल्याही प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही व भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2)  च्या विशेष अधिकारांचा वापर करण्यात आलेला नाही. मराठवाडा व विदर्भ दोन्ही भागाचा सिंचनातील व उद्योगातील अनुशेष भरून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) ची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ व विदर्भ विकास महामंडळ यांना विशेष अधिकार देऊन भरघोस निधी देऊन या दोन्ही भागातील सिंचनाचा व उद्योगधंद्यातील अनुशेष भरून काढला तर शेतकरी आत्महत्या थांबतील. अशा प्रकारची विनंती ॲड.माधव जाधव यांनी खा.राहुलजी गांधी यांच्याकडे केली. महाराष्ट्राचे खंबीर लढवय्ये शेतकरी नेते आ.नानाभाऊ पटोले यांच्यामुळे ॲड.माधव जाधव यांना मराठवाड्यातील शेतकरी बांधवांची कैफियत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा.राहुलजी गांधी यांच्याकडे मांडण्याची संधी मिळाली त्यामुळे ॲड.माधव जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले  यांचे खूप - खूप आभार मानले. यावेळी ॲड.माधव जाधव यांच्या सोबत युवक काँग्रेसचे परळी विधानसभा उपाध्यक्ष रणजित भाऊ हारे हे उपस्थित होते.


=========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड