मॉड्युलर गरजवंतांसाठी परळीत लवकरच शिबीर घेणार - डॉ.संतोष मुंडे

मॉड्युलर गरजवंतांसाठी परळीत लवकरच शिबीर घेणार - डॉ.संतोष मुंडे

=========================


परळी (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

अपंगासाठी महत्वाचे असणारे मॉड्युलर हात व पाय ज्याची किंमत एक लाखापर्यंत असल्याने सर्वसामान्य अपंगांना ते खरेदी करणे अवघड आहे. यासाठी आपण लवकरच शिबीर घेणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अपंगासाठी कार्यरत असणारे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. डॉ.मुंडे यांनी पुणे येथे भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन कार्यालयास भेट देवुन अत्याधुनिक मॉड्युलर (modular) पाय व हात ज्याची किंमत अंदाजे 1 लाखांपर्यंत असते याची पहाणी केली. हात व पायांनी विकलांग असलेल्या व्यक्तीसाठी मॉड्युलर हात व पाय अत्यंत गरजेचे आहेत. यासाठी अनेकांना याबाबत माहिती नाही यासाठी लवकरच मोफत शिबिर घेणार असुन ज्या अपंग गरजवंतांना या मॉड्युलर हात,पायांची गरज आहे त्यांनी संपर्क करावा असे आवाहन डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.


=======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड