सामाजिक कार्यकर्ते एस.बी.सय्यद यांच्या हस्ते बनसारोळा येथे कर्तबगार शिक्षक व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव
अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
येथील सामाजिक कार्यकर्ते एस.बी.सय्यद यांच्या व त्यांचा NRI इंजिनियर मुलासोबत त्यांनी शुक्रवार, दि 12 नोव्हेंबर रोजी बनसारोळा येथील महाराष्ट्र विद्यालयाला दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट दिली. लंडन, दुबई आणि कुवेत मध्ये गत 13 वर्षांपासून कार्यरत असलेला माझा छोटा मुलगा सय्यद इमरान हा 5 वर्षानंतर सध्या भारतात सुट्टीवर आलेला आहे. वडीलांच्या (अर्थात माझ्या) प्रिय जनांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेण्याची इच्छा त्याने माझ्या जवळ प्रदर्शित केली होती. म्हणून मी त्याला पहिल्या टप्प्यात इथे घेऊन आलो. या शाळेत मी विद्यार्थी दशेत ज्या वर्ग खोल्यांमधून स्वत: शिक्षण घेतले, नंतर त्याच वर्ग खोल्यांमध्ये जाऊन शिक्षक म्हणून अध्यापन करण्याची सुवर्णसंधी कै.पुज्य नारायण दादांनी मला वयाच्या 17 व्या वर्षीच बहाल करून दिली. हा माझ्या जीवनाचा यशस्वी Turning Point ठरला. तब्बल 41 वर्षे अखंड सेवा करण्याचे मला भाग्य लाभले. शाळेत पुर्वी असलेले माझे सर्व ज्येष्ठ सोबती व सहकारी आता सेवानिवृत्त झाले आहेत किंवा देवाघरी तरी गेले आहेत. आता या शाळेत बहुतांश माझेच माजी विद्यार्थी अध्यापक बनले आहेत. याचा मला रास्त अभिमान वाटतो. त्यांचीही मुले कर्तबगारी दाखवून सध्या गगन भरारी घ्यायला सज्ज झाले आहेत. त्यांचे कोड कौतुक करून त्यांच्याशी हितगुज साधावे हाही उद्देश मनी बाळगून या भेटीचे आम्ही प्रयोजन केले होते. तट सुधाकर सरांचा ॠत्विक IIIT मध्ये, शेंगुळे सरांचा मुलगा BDS मध्ये, रंगनाथ काकडे सरांचा विश्वजीत BAMS ला, शिवाजी पवार सरांचा आदित्य MBBS ला, देवकते मॅडमची मुलगी रशियामध्ये MBBS ला तर तुकाराम सोळुंकेची मुलगी BAMS ला नुकतेच प्रवेशित झाले आहेत. हंडीबाग सरांच्या मुलाने पत्रे बनविण्याचा Industry उद्योग नुकताच सुरू केला आहे. या सर्व कर्तबगार मुलांच्या पालकांचा अर्थात तेथील गुरूजनांचा उचित सत्कार माझ्या व इमरान यांचे हस्ते करण्यात आला.
================
Comments
Post a Comment