रूग्णांचे आशिर्वाद हेच खरे डॉक्टरांचे पाठबळ - अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर

मधुमेह दिनानिमित्त मोफत महाशिबीरात १४०० रूग्णांची तपासणी व औषधोपचार 

अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) रूग्णांचे आशिर्वाद हेच खरे  डॉक्टरांचे पाठबळ असते. म्हणूनच समाज रूग्णसेवेला ईश्वर सेवेचा दर्जा देतो. असे प्रतिपादन अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केले.


येथील योगेश्वरी डायबिटीस केअर सेंटर, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने मधुमेह दिनानिमित्त मधुमेहावरील मोफत महाशिबीराचे आयोजन प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ.अतुल शिंदे, आहार तज्ज्ञ डॉ.स्वाती शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते.या महाशिबीरात १४०० रूग्णांची मोफत तपासणी तपासणी व औषधोपचार करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद (दादा) चिक्षे होते. तर व्यासपीठावर आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, रोटरीचे अध्यक्ष मोईन शेख, सचिव भीमाशंकर शिंदे, संयोजक डॉ.अतुल शिंदे, डॉ.स्वाती शिंदे उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी डॉक्टर व रुग्ण यांच्यातील नाते व परस्परांवरील विश्वासच आजार दूर करतो. असे सांगितले. डॉ.अतुल शिंदे व डॉ.स्वाती शिंदे यांनी अनेक रूग्णांना योग्य औषधोपचार करून मधुमेहापासून मुक्त केले आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून  केला. अध्यक्षीय समारोपात प्रसाद चिक्षे यांनी मधुमेही रुग्णांनी कसलाही ताण-तणाव न बाळगता आनंदमय जीवन जगण्याचा सल्ला दिला. यावेळी डॉ.स्वाती शिंदे, डॉ.राजेश इंगोले, मोईन शेख यांची भाषणे झाली. दीपप्रज्ज्वलन व धन्वंतरीच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अतुल शिंदे यांनी केले. सुञसंचलन विनायक मुंजे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार भीमाशंकर शिंदे यांनी मानले. या शिबिरामध्ये मधुमेहावरील माहिती पुस्तिकांचे वाटप ही  करण्यात आले.



 या झाल्या तपासण्या :-                                                       

या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा, तीन महिन्यांची साखरेची सरासरी, किडनीची तपासणी, रक्तातील चरबी, शरीरातील चरबी, दम्याची तपासणी, पायांच्या नसांची तपासणी, इ.सी.जी., थायराॅईड तपासणी, वजन व उंची इत्यादी तपासण्यां करण्यात आल्या. 

------------------------------

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड