सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धायगुडे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
रक्तदान शिबिरात केले 90 जणांनी रक्तदान
================
अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज) येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिञ मंडळाकडून फळवाटप व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिञ मंडळाकडून स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच अंबाजोगाई शहरातील पवनसुत हनुमान मंदिर, कुत्तरविहीर येथे भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, श्रीकांत धायगुडे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यापूर्वी त्यांनी रक्तदान शिबिर, फळवाटप, वृक्षारोपण, गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, दांडिया महोत्सव अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. श्रीकांत धायगुडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शहरातील सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या फळवाटप कार्यक्रम, रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष सुरवसे, शरद शिंदे, मनोज मसने, सिद्धेश्वर शिरसठ, अभय काळे, प्रशांत काळदाते, दत्ता गोरे व रोशन कातळे आदींसह मिञ परिवाराने परिश्रम घेतले, वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत श्रीकांत धायगुडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
================
Comments
Post a Comment