वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना राज्यशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना राज्यशासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

१ लाख २५ हजारांचे मिळणार बक्षीस

======================


अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

अंबाजोगाई येथील वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना महाराष्ट्र शासनाच्या वन व महसुल विभागाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्दितीय व विभागीय स्तरावरील पहिला “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार” नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था व ग्रामविभाग जिल्हा स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये सुधाकर देशमुख यांना व्यक्ती पातळीवरील राज्यस्तरीय पहिला व विभागीय पातळीवरील पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख २५ हजार रूपये बक्षिसाची रक्कम त्यांना या पुरस्कारा सोबत मिळणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर (पाटोदा) येथील रहिवासी असलेल्या सुधाकर देशमुख यांनी शालेय शिक्षणापासूनच वृक्ष लागवड आणि संवर्धनाची आवड जोपासली होती. पुढे १९८५ पासून आपल्या या आवडीला त्यांनी सार्वजनिक स्वरूप देवून ही चळवळ अधिक व्यापक केली. सलग २० वर्षे वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम करणाऱ्या सुधाकर देशमुख यांनी सर्वप्रथम राज्यातील वृक्षांची गणना करण्यात यावी ही मागणी राज्य शासनाकडे केली होती. या मागणी शासनाकडे हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. सुधाकर देशमुख यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी केलेल्या कामाची दखल घेवून राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणा-या “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार” जाहीर केला आहे. सदरील पुरस्कार निवडीसाठी राज्यातुन प्राप्त झालेल्या प्रास्तावांची छाननी करून योग्य व्यक्ती व संस्थांची निवड करण्यात येवून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या रकमेचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असुन विभागीय स्तरावरील पुरस्काराचे वितरण १० डिसेंबर २०२२ पर्यंत पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात यावे असे या शासन निर्णयात म्हटले आहे. सदरील निर्णयावर महसूल व वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ.रविकिरण गोवेकर यांची स्वाक्षरी आहे. सदरील पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचे अनेकांनी स्वागत केले आहे.


================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड