इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी पुरस्काराने सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले दुसऱ्यांदा सन्मानित
इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी पुरस्काराने सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले दुसऱ्यांदा सन्मानित
सर्वस्तरांतून डॉ.राजेश इंगोले यांचे अभिनंदन
========================
अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा व अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी या पुरस्काराने येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांना नुकतेच दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले. हा बहुमान प्राप्त करणारे डॉ.इंगोले हे पहिलेच डाॅक्टर ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.
आपल्या स्पृहणीय कामगिरी बद्दल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले की, आमच्या सर्व हितचिंतक मित्र परिवारास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, इंडीयन मेडीकल असोसिएशनचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय डॉ.सुरेश नाडकर्णी या पुरस्काराने मला यावर्षी ही राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत नुकतेच सन्मानित करण्यात आले. मला हा पुरस्कार दुसऱ्यावेळी प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात हा पुरस्कार दोन वेळा कोणालाच मिळाला नाही, मला मिळाला याचे श्रेय मला तोलामोलाची साथ देणारे डॉ.सचिन पोतदार, डॉ.विजय लाड, डॉ.जुबेर शेख, डॉ.राहुल डाके, डॉ.बळीराम मुंडे, डॉ.योगेश मुळे यांच्यासह जेष्ठ मार्गदर्शक डॉ.दिलीप खेडगीकर, डॉ.एन.पी. देशपांडे, डॉ.उत्तम निसाले, डॉ.शैलेश वैद्य, डॉ.नरेंद्र काळे यांच्यासह सर्व आयएमएच्या जेष्ठ आणि श्रेष्ठ साथीदारांचे आहे. हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. आयएमएचा अध्यक्ष झाल्यापासून इंडीयन मेडीकल असोसिएशनचे दोनदा बेस्ट प्रेसिडेंट, दोनदा बेस्ट ब्रँचचा, एक बेस्ट social security मेंबर्स ड्राईव्ह आणि दोनदा डॉ.सुरेश नाडकर्णी हे पुरस्कार मिळाले आहेत. माझ्या विविध संकल्पनांना मूर्त स्वरूप देणाऱ्या सर्व साथीदारांचे मनःपूर्वक आभार. असेच कार्य पुढे करीत राहील अशी आपणांस ग्वाही देतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी केले.
========================
Comments
Post a Comment