"महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ.आंबेडकर" या हिंदी ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
"महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ.आंबेडकर" या हिंदी ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
मान्यवरांची उपस्थिती ; प्रा.गौतम गायकवाड लिखित ग्रंथाचा हिंदीत अनुवाद
================
बेंगलुरू (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
बसव समिती, बेंगलुरू यांंच्या वतीने प्रवर्तनवादी चळवळीतील प्रख्यात लेखक प्रा.गौतम गायकवाड (अंबाजोगाई) यांनी मराठी भाषेत लिहीलेल्या ग्रंथाचा हिंदी भाषेतून "महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ.आंबेडकर" असा अनुवाद करण्यात आला, या हिंदी ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
"महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ.आंबेडकर" या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन बसव समिती (बेंगलुरू) चे अध्यक्ष अरविंद जत्ती व शिवरूद्र महास्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, लेखक प्रा.गौतम गायकवाड, अनुवादक डॉ.जिभाऊ मोरे, बी.एस.बनसोडे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना अरविंद जत्ती म्हणाले की, महात्मा बसवेश्वर हे एक ज्ञानप्रकाश होते, पुढील काळात महात्मा बसवेश्वरांचे विचार विविध भाषांमधून जगभर पोहचविणार आहोत, तर प्रा.गौतम गायकवाड लिखीत "महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ.आंबेडकर" या ग्रंथाचे इंग्रजी व कन्नड भाषांमधून अनुवाद करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, तथागत गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या तीन ही महामानवांनी आपल्या जीवनकार्यातून "संपूर्ण जगाचे कल्याण व्हावे" हा मौलिक संदेश जगाला दिला असे अरविंद जत्ती यांनी सांगितले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे म्हणाले की, "महात्मा बसवेश्वर और बोधिसत्व बाबासाहेब डॉ.आंबेडकर" या ग्रंथाचा हिंदी भाषेतून अनुवाद केल्याने हा ग्रंथ आता संपूर्ण भारतात वाचला जाईल, अतिशय परीश्रमपूर्वक, विविध संदर्भ आणि दाखले देत, अभ्यासपूर्ण पध्दतीने लेखक प्रा.गौतम गायकवाड यांनी हा ग्रंथ लिहीला असून डॉ.जिभाऊ मोरे यांनी जैसे थे आशय ठेवून या ग्रंथाचा हिंदी भाषेतून योग्य अनुवाद केला आहे, हे पुस्तक हिंदी भाषेतून आले पाहीजे अशी अनेक अभ्यासकांची मागणी होती जी आज पूर्ण होत आहे बसव समिती (बेंगलुरू) चे अध्यक्ष अरविंद जत्ती व शिवरूद्र महास्वामी महाराज यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले ही गौरवपूर्ण बाब असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांनी केले, तर यावेळेस बोलताना लेखक प्रा.गौतम गायकवाड म्हणाले की, महात्मा बसवेश्वर आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्यासाठी सारख्या विचारांची मांडणी करून विश्लेषण केले आहे, जातीधर्माच्या पुढे जावून प्रत्येक महापुरूषाला आपण समजून घेतले पाहीजे, तथागत गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तीन ही महामानव एकाच वाटेवरील प्रवासी आहेत, त्यांच्या विचारांचा जागर केला पाहीजे, आधुनिक समाजाने महात्मा बसवेश्वर आणि डॉ.आंबेडकर या महामानवांना नव्याने समजून घेतले तर जगाचे भले होईल असे लेखक प्रा.गायकवाड हे म्हणाले, तसेच यावेळेस बोलताना अनुवादक डॉ.जिभाऊ मोरे यांनी सांगितले की, तथागत गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या वाटेने चालणारांसाठी हा ग्रंथ एक मार्गदर्शक ठरेल, लेखक प्रा.गौतम गायकवाड यांच्या मुळ मराठी ग्रंथातील आशय जैसे थे ठेवूनच या ग्रंथाचा हिंदी भाषेतून अनुवाद केला असल्याचे अनुवादक डॉ.मोरे यांनी नमूद केले कार्यक्रमाचे सुञसंचालन करून जितेंद्र जोंधळे यांनी उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी बसव समिती (बेंगलुरू) चे सर्व सन्माननिय पदाधिकारी व कार्रकर्ते, जितेंद्र जोंधळे, जयश्रीताई जोंधळे, सुनिताताई मोरे, वर्षाताई गायकवाड व परीसरातील साहित्य प्रेमी नागरीक, महिला उपस्थित होते.
=======================
Comments
Post a Comment