अंबाजोगाईचे डॉ.अनंत शिनगारे यांची ‘हाफकिन’च्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती
अंबाजोगाईचे डॉ.अनंत शिनगारे यांची ‘हाफकिन’च्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती
=====================
अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) मुंबई येथील ग्रांट शासकीय रूग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ.अनंत कारभारी शिनगारे यांची राज्य शासनाने हाफकिन महामंडळाच्या यंत्रसामुग्री व औषधी खरेदी कामकाज पाहण्याकरिता महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.अनंत शिनगारे हे मुळचे अंबाजोगाईचे आहेत.
डॉ.अनंत शिनगारे यांनी यापूर्वी अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात कर्तव्य बजावले आहे. येथील उत्कृष्ट सेवेनंतर त्यांची नियुक्ती मुंबईच्या जेजे रूग्णालयात झाली होती. त्यानंतर कोरोना काळात त्यांनी रूग्णालयाचे प्रभारी अधिक्षक म्हणून ही काम पहिले. कोविड प्रकोपातील नियोजन आणि उत्कृष्ट रूग्णसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.शिनगारे यांचा गौरव केला होता. सध्या ते ग्रांट शासकीय रूग्णालयात शरीररचनाशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. डॉ.अनंत शिनगारे यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाकडून त्यांची हाफकिन महामंडळाच्या मुंबई येथील महासंचलनालया अंतर्गत यंत्रसामुग्री व औषधी खरेदी विभागातील कामकाज पाहण्याकरिता महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील आदेश राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून शुक्रवारी (दि.१८) निर्गमित करण्यात आले आहेत. डॉ.अनंत शिनगारे यांच्या नियुक्तीचे अंबाजोगाई शहरातून स्वागत करण्यात येत आहे.
================
Comments
Post a Comment