अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे - दत्तात्रय अंबेकर


अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे पिंपरी चिंचवड येथे दिनांक १९,२० नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून या अधिवेशनास सर्व पत्रकार बांधवांनी तसेच विविध मीडिया सेलच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्ह्या कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांनी केले आहे. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे यांचा मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जेष्ठ पत्रकार यांचे मार्गदर्शन होणार आहे याच बरोबर या राष्ट्रीय अधिवेशनात  अनेक प्रसिद्ध मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे या अधिवेशनात पत्रकारांचे प्रश्न व त्यावरील पुढील दिशा व काहीं ठराव निश्चिती करणार आहेत. प्रत्येक दोन वर्षांनी मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होत असते. या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांसाठी एक खास मेजवानी असते.मागील राष्ट्रीय अधिवेशन नांदेड नगरीत पार पडले होते. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे हे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन येत्या १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील शंकरराव गावडे भवन येथे संपन्न होणार आहे.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई तालुक्यातील सर्व  पदाधिकारी सभासदांनी अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांनी केले आहे.

==================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड