संकल्प विद्यामंदिर येथे बालदिनानिमित्त कायदेविषयक जागरूकता शिबीर ; तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा संयुक्त पुढाकार

संकल्प विद्यामंदिर येथे बालदिनानिमित्त कायदेविषयक जागरूकता शिबीर ; तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचा संयुक्त पुढाकार



बालकांचे हक्क, अधिकार याबाबत न्यायाधीश कुणाल जाधव यांचे मौलिक मार्गदर्शन

=======================

अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)

बालदिनाचे औचित्य साधून शहरातील संकल्प विद्यामंदिर येथे तालुका विधी सेवा समिती, अंबाजोगाई व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॅन इंडिया जागरूकता आणि पोहोच कार्यक्रम आणि कायदेशीर सेवा सप्ताहानिमित्त "बालकांचे हक्क व त्यांचे अधिकार" या बाबत मौलिक असे मार्गदर्शन करण्यात आले. 



या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना न्यायाधीश कुणाल ध.जाधव (जिल्हा व सत्र न्यायाधीश - 4, अंबाजोगाई.) हे म्हणाले की, लहान मुलांचे समाजातील स्थान काय आहे आपण हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे, मुलांचे योग्य संगोपन, संरक्षण करून त्यांना मदत केली पाहिजे, आई - वडीलांप्रमाणेच शिक्षक ही मुलांचे पालकच आहेत. घर असो वा शाळा मुले सुरक्षित असली पाहिजेत, लहान मुलांनी बोलले पाहिजे, समाजात लहान मुलांची तस्करी होत असते, अशा अनेक घटना घडत असतात. मुले पळवून त्यांना वाममार्गाला लावले जाते. मुलांच्या तस्करीत महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो, तेव्हा मुलांनो अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, त्यांचेकडून काही वस्तू, खेळणी व चाॅकलेट असे काहीही घेवू नका. त्यांच्यापासून दुर रहा, तुमच्या बाबतीत काही चुकीचा प्रकार, घटना घडली असेल, आणि काही ञास होत असेल तर तात्काळ आपले पालक, शिक्षक प्रसंगी पोलिसांना ही सांगा. शिक्षणाचा अधिकार, तसेच संरक्षण देणारे इतर कायदे या विषयी अत्यंत सहज, सोप्या भाषेत संवाद साधून उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व पालकांना अत्यंत उपयुक्त ठरेल अशी माहिती न्यायाधीश जाधव यांनी दिली. तर यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून एॅड.शरदराव लोमटे (अध्यक्ष, वकील संघ, अंबाजोगाई.), एॅड.शिवाजी डी.कांबळे (वकील संघ, अंबाजोगाई.), एॅड.अनंत बी.तिडके (वकील संघ, अंबाजोगाई.), एॅड.अशोकराव कुलकर्णी (सरकारी वकील), एॅड.एल.बी.जगताप (वकील संघ, अंबाजोगाई.), श्रीमती समृध्दी दिवाणे - काळे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अंबाजोगाई.), गटशिक्षणाधिकारी सी.आर.शेख (पंचायत समिती, अंबाजोगाई) तसेच संकल्प विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे, संस्थेचे कार्यवाह प्रा.कैलास चोले या मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांकडून दीपप्रज्ज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. तर संकल्प विद्यामंदिर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळेस मुख्याध्यापिका श्रीमती रेखा सुभाष बडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संकल्प विद्यामंदिर शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरीता कोणकोणते उपक्रम राबविण्यात येतात, नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात याची विस्तृत माहिती दिली. तर एॅड.एल.बी.जगताप यांनी "बाल दिन" या विषयावर, गटशिक्षणाधिकारी सी.आर.शेख यांनी "बालकांचा मार्फत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार" या विषयावर तसेच एॅड.अनंत बी.तिडके यांनी "मुलांचा हक्क" या विषयावर आणि सरकारी वकील एॅड.अशोकराव कुलकर्णी यांनी ही आपले मौलिक विचार मांडले. तर सहशिक्षक व्ही.बी.गायकवाड यांनी सुञसंचालन केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक आर.एस.मोहाडे यांनी मानले. या प्रसंगी बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश - 4 श्री कुणाल ध.जाधव, गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने, गटशिक्षणाधिकारी सी.आर.शेख तसेच  वकील संघाचे अध्यक्ष एॅड.शरदराव लोमटे यांच्यासह विधी व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेसह पारीतोषिक देण्यात आले. या स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे प्री प्रायमरी गटातून - 1) ईश्वरी श्रीकांत खुणे    - (प्रथम), 2) विश्वजा विकास गिरी - (द्वितीय), 1 ते 4 वर्ग गटातून 1) पठाण बरीरा जोहर - (प्रथम), 2) सानिध्या ओंकार स्वामी - (द्वितीय) आणि 3) शरयू कैलास चोले तसेच इयत्ता 5 वी ते 8 वी वर्ग गटातून 1) प्रगती सुधाकर केंद्रे - (प्रथम), 2) गौरी अशोक नखाते - (द्वितीय), आणि 3) तनिष्का बळीराम मुंडे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. वर्षा देशमुख यांनी शाळेस भेटवस्तू दिली. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.


=========================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड