मधुमेह दिनानिमित्त मधुमेह निदान व उपचार महाशिबीराचे अंबाजोगाईत आयोजन - मधुमेह तज्ज्ञ डॉ.अतुल म.शिंदे यांची माहिती
अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) संपुर्ण जगामध्ये १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो.योगेश्वरी डायबिटीस केअर सेंटर अंबाजोगाई तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मधुमेह दिनानिमित्त मधुमेह निदान व उपचार महाशिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती योगेश्वरी डायबेटिक केअर सेन्टरचे संचालक तथा सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ.अतुल शिंदे यांनी केले आहे.
मधुमेह ही एक जागतिक समस्या असून दिवसेंदिवस या आजाराचे रूग्ण वाढत आहेत. योग्य वेळी निदान, उपचार झाल्यास हा आजार केवळ आटोक्यातच नाही तर समूळ नष्ट करता येतो त्यामुळे मधुमेहावरिल या महाशिबीराचा लाभ अंबाजोगाई शहरातील व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिबीराचे मुख्य आयोजक मधुमेह तज्ज्ञ डॉ.अतुल शिंदे व आहारतज्ज्ञ डॉ.सौ.स्वाती शिंदे यांनी केले आहे. या शिबिरामध्ये मधुमेहाशी निगडित सर्व तपासण्या पुर्णतः मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तशर्करा, तीन महिन्यांची साखरेची सरासरी (एच बी ए १ सी), किडनीची तपासणी, रक्तातील चरबी, शरीरातील चरबी, दम्याची तपासणी, पायांच्या नसांची तपासणी, इ.सी.जी, थायराॅईड तपासणी, वजन व उंची,इत्यादी तपासण्यांचा समावेश आहे. या शिबिरामध्ये मधुमेहावरील माहिती पुस्तिका मोफत वाटप करण्यात येणार आहेत. तरी दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी,सोमवारी या शिबिरामध्ये बहुसंख्येने सहभाग नोंदवुन या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेश्वरी डायबिटीस केअर सेंटरचे संचालक डॉ.अतुल म.शिंदे आयोजक अंबाजोगाई, इंडियन मेडिकल असोसिएशन अंबाजोगाई, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांनी केले आहे.
====================
Comments
Post a Comment